Posts

Showing posts from September, 2018

माझ्या अस्थिर देशा...

कुठे चाललाय महाराष्ट्र माझा ....!! खरंच पावलं पुढे पडत आहेत की मागे ....!!! राज्याच्या प्रतिमेला गालबोट लागतील , अश्या काही घटना माझ्या ह्या पुरोगामी राज्यात होऊ घातल्या जात आहेत ... आधी धर्माधर्माच्या भांडणात गुंतलेल्या प्रजेला आता भांडायला जातींचं नवीन कारण मिळालय ... काही दिवसांनी रंगावरून भांडायला लागतील .... ह्यात शंका नाही !!... राजकारणीच काय प्रत्येक माणूस , होणाऱ्या अस्थिरतेला कारणीभूत असतो ... राजकारण्यांच कामच , लोकांमध्ये भांडण लावून द्यायची आणि त्याचा राजकीय फायदा आपण उचलायचा .. हे वर्षानुवर्षे चालत होत , चालत आहे आणि चालत राहिलाही . कारण प्रजेला आपल्या ताकदीचा अंदाज आलेला नाहीच .. प्रजेला वाटतं २ मिनिटांच्या भाषणात किती तथ्य आहे .. पण त्या भाषणामागची पार्श्वभूमी प्रजेला कशी कळणार . आज जाती जातीत माणूस लढतोय आणि सौख्याने नांदणाऱ्या माझ्या पुरोगामी राज्याच्या इतिहासाला गालबोट लागतंय .. त्याला कोण कारणीभूत आहे ... त्याची काळजी कोण घेतंय...