तू बापाला विसरलास
बापाचे गोडवे तू कधी गात नाही आणि बापही तुला कशाची कमी पडू देत नाही..... १ लहानपणापासून बापाची भीती वाटत होती , म्हणून तू आईच्या कुशीत विसावलास ... पण घराला घरपण मिळावं म्हणून शरीराच पाणी पाणी करणाऱ्या ह्या बापाला तू विसरलास.....२ दिवसभराच्या उन्हाला शरीराचा सोबती मानत तो राब राब राबला, घरी जाताच चिमुकल्याच्या आलिंगनाची आस धरून जगत राहिला......३ कधी घरापासून दूर गेलास तर आईच्या आठवणीने तू व्याकुळ झालास, पण बापाला तू गेल्याच किती दुःखच होतंय, हेच बघायचं राहिलास.... ४ तुझ्यासाठी बाप म्हणजे ATM मध्येे पैसे टाका म्हणून रडणं... पण कधी पाहिलस का , ATM भरतं रहावं म्हणून, बापाचं रात्र रात्र जागून काम करणं....५ मुलीसाठी नेहमी तो जादूगरा सारखा जगतो, लग्नाच्या दिवशी तिच्या , स्वतःचे अश्रू लपवत फिरतो.....६ बाप कठोर , निर्दयी , मारकुटा म्हणून दूरच त्याच्या तू राहिलास, पण तुला मारतानाही किती दुःखं होत असेल त्याला, कधी पाहिलस..... ७ बाप गेल्याच दुःख , बाप गेल्यावरच कळेल का आभाळा एवढी किंमत , रडून रडून मोजशील का........८