देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त



         एक असतात ज्यांना देव आवडत नाहीत, म्हणून स्वतःला नास्तिक म्हणवून घेत फिरणारे आणि दुसरे असतात, देवाचे भक्त, देवाचे पूजक, देवाला सर्वस्वी मानणारे, आस्तिक. ह्यांना तशी वैयक्तिक प्रसिद्धीची गरज भासत नाही कारण देवाला पूजताना त्यांचे नाव लौकिक होतेच. पण आस्तिकांच देवाला वेगवेगळ्या प्रकारे पूजणं नास्तिकांच्या कधीकधी जास्तच नाकीनऊ आलेलं दिसून येतं. मग नास्तिकांवर त्यांच्यातील नास्तिकता कमी करून आस्तिकांसारखं बनू पाहण्याची वेळ येते.

                कधी कधी नास्तिकांना देवाचा राग तरी का आणि कशामुळे आलेला आसतो हे कळने अशक्यच होऊन बसतं. मग आस्तिकांसारखं संकटकाळी ते कुणाला हाक मारत असतील? कुणास ठाऊक.   पण आस्तिकांच्या भक्तीला दाद म्हणून संकटकाळी देव धावून येतो वा येत नाही हा भाग वेगळा. एकंदरीत आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून  स्वतःला नास्तिक म्हणवून घेण्याचा त्यांचा खटाटोप चाललाय अस वाटत...आणि आस्तिक माणसं देवाच्या सेवेत तल्लीन होत दिवसंदिवस पूर्ण बहाल करताना दिसतात.

               कधी कधी तर काही आस्तिकांना कोट्यावधी देवांमध्ये आपला जवळचा देव कोणता म्हणून शोधण्यात थोडा वेळ खर्च घालावा लागत असावा, कदाचित हा प्रश्न अर्धअस्तिक आणि अर्धनास्तिक लोकांना जरूर पडला असेल. काम पडताच देवाचे पाय पकडणारी, म्हणजेच देवांच्या भक्तांमध्ये पडणार ही तिसरा प्रकार. संकटकालीन समयी मंदिर देवस्थानांची वाट शोधणारी आणि संकट दूर पळताना दिसतंय म्हणून पांढरी पाठ करणाऱ्यांचा हा जणू तिसरा प्रकार.

पण परत एकदा आस्तिक म्हणजे देवांची सार्वजनिकरीत्या भजनं पारायणं इ. कार्यक्रमे ठेऊन देवाची कीर्ती गाजवणारे. इतरांनाही त्यात सामील करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कारण त्यांच्याकरिता सर्व आस्तिकच आणि नंतर त्याच कार्यक्रमासमोरून नजर चुकवत त्या कार्यक्रमास गालबोट लावणारे नास्तिक भक्त आणि शेवटी त्याच कार्यक्रमात देवाने आपली इच्छा पूर्ण करावी म्हणून भजनात तल्लीन झालेला तात्पुरता भक्त, अर्थात त्याच्या ह्या प्रयत्नांना कितपत यश मिळत हे त्यालाच माहिती, अश्याप्रकारे देवाच्या भक्तांना विभागता येईल.

                माणसाने जागा जशी विकता  येते तशी देवं विघागुन घेतली. आणि त्या समूहांना धर्म म्हणून संबोधले. आणि त्यामुळे माणसंही सोबत विभागल्या गेलीच. एकप्रकारे माणसांच्या चांगल्या करीता देव असेल तर माणसाचे वाईट होण्यासही तोच कारणीभूत आहे असे म्हणता येईल.

  एका अवहाला नुसार येत्या २०५० पर्यंतच्या काळात जगातील ८०% लोक पूर्णपणे नास्तिक झालेली असतील असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच तेव्हाची लोकं निर्णय घेण्याबाबतीत कुणावर (देवावर) अवलंबून न रहाता निडर होत स्वःनिर्भर झालेली असतील, असे म्हणायला हरकत नाही......

धन्यवाद 

लेखक:- मयूर श्री  बेलोकार

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास