MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..
दोन शब्द सहसा कुठल्याही विषयावर लिहिताना मी त्या विषयी कुणी लिहिले असता त्यावर लिहिणे टाळतो. पण ह्या वेळी परीस्थिती वेगळी होती. MS DHONI नावाच्या जगज्जेत्या व्यक्तीवर मला लिहिणे होते. MS DHONI वर अनेक पुस्तके लिहूनही झालीत, पण एका चाहत्याच्या नजरेने मी लिहिण्याचे ठरवले.. लिहिता लिहिता त्यानी केलेल्या विश्वविक्रमांच वर्णन कितीही केले तरीही मन भरत नसे... पण प्रयत्न केले सर्व काही या लेखात सामावून घेण्याचे.. तुम्हाला आवडेल एवढीच आशा.. धन्यवाद. आज जगात प्रत्येकाला भुरळ पडणारा तू माझा आवडता खेळाडू आहेस, याचा मला मनापासून अभिमान आहे. जगात तुझ्या स्वभावाने, तुझ्या खेळण्याचा विलक्षण पद्धतीने आणि तुझ्या नेतृत्व करण्याचा शैलीने एक वेगळी ओळख निर्माण झाली. एका लहान शहरातून येत तू पूर्ण जगाला वेड्यात काढलस. आज तुझा चाहता, तुझी एक झलक मिळावी म्हणून कुठल्याही स्तरावर जायला तयार होतो. त...