बोचलीच पाहिजे (कविता सहावी)
बोचलीच पाहिजे
ह्याला त्याची काळजी नाही, त्याला ह्याची काळजी नाही
म्हणता म्हणता देशाचीही कुणाला काळजी नाही......१
भेसळयुक्त राजकारणाची, रीत तुम्ही जपली
अच्छे दिनाच्या नावाखाली किती हो तुम्ही मत लाटली.....२
देश विकोपाला जातोय, लक्ष नाही कुणाचं
महागाई चांगल्या साठीच वाढली, अस म्हणून कस चालायचं......३
महागाई चांगल्या साठीच वाढली, अस म्हणून कस चालायचं......३
वेळ आली जेव्हा, तुमची काम दाखवायची....
तेव्हाच का जुनी प्रकरण, तुम्ही वर काढायची.....४
स्वतःच्या चूक झाकत, दुसऱ्याच पहावं तुम्ही वाकून
जुने खटले वर काढत, आपलेच दुष्कर्म ठेवता तुम्ही झाकून.....५
जुने खटले वर काढत, आपलेच दुष्कर्म ठेवता तुम्ही झाकून.....५
घटना घडली तर, तुम्ही तोंड झाकून पळ काढता
उद्घाटनाला तुम्हीच तोंड वर करून पळत येता.....६
करतोय काम एक, श्रेय लाटतायेत हजार
तुमच्या या भानगडीत, सामान्य माणूस होतोय बेजार ....७
समोर शेतकरी दिसतोय मरताना, वाटत काहीच ह्यांना नाही
दगड मातीचे हे, लाज ह्यांना थोडीही वाटत नाही.....८
गाजा वाजा केला हो किती तुम्ही येताना
लाज कशी वाटली नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणताना....९
सुरुवात कशीही असो, शेवट तर ठरलाय
विकासाच्या नावा खाली, तुम्ही गरिबाचा जीव घेतलाय.....१०
khatrnak
ReplyDelete