स्नेहलता (भाग चौथा आणि पाचवा)

भाग चौथा

                                      मी स्नेहलता नावावर लिखाण  ३ भागां मधेच संपवायला नको होत, हे मला आता कळून चुकल. कारण पुढली ६ महिने ती माझ्या समोर असेल, त्यामुळे तीच्यावर लिहिणे एवढ्यात संपणे शक्य नव्हतेच.

दि २९ सप्टेंबर २०१७ ची गोष्ट,
                                   मी ३रा भाग संपला म्हणून,  निवांत बसलेलो होतो.  तिची आठवण मनात सारखी सारखी सलत होती. थोड बाहेरून फिरून याव अशी मनी इच्छा झाली.  भावाला सोबत घेऊन कुठे तरी  जाव अस ठरवल. आणि ताच्या घरी पोहचलो. तितक्यात मित्र प्रणव त्याचा  फोन आला आणि त्यांनी कळवल कि ती तिकडे जात आहे, तुझ्या घरासमोरून ती पुढे निघाली आहे म्हणून. एवढ ऐकल आणि मी माझी सर्व चक्र फिरवली.
                                        मला तिची आणि तिच्या नजरभेटींची गरज होतीच. सलग सुट्ट्यांमुळे मला कंटाळा आला होता, घरात बसून राहण्याचा. आणि त्यात अशी बातमी मिळाल्यावर मला हि संधी गमवायची नव्हती. ती पोहचायच्या आधीच मी तिथे हजेरी लावली आणि तिच्या येण्याची वाट पाहत राहिलो. वाट पाहणे संपले. ती समोरून जात होती, नजरभेटी परत एक होत होत्या. पण दुरावा कायम होता. आपल्यात काही नसून सुद्धा तू माझ्याकडे का पाहत रहाव ?या प्रश्नच उत्तर मला मिळत नव्हत. पुढे कितीतरी नजरभेटी अश्याच होत गेल्या आणि मी त्यांना साठवत गेलो. त्या २ तासांनी मला पुढल्या काही दिवसांसाठीच्या आठवणी तयार करून दिल्या.

भाग पाचवा
                     
दि ५ ऑक्टोबर २०१७

आज कॉलेज होत. खूप काही गोष्टी आज घडल्या. काही होत्या कायम स्मरणात ठेवण्या सारख्या.
त्या पैकीच हि एक. 

                    कॉलेज सुटूनही काही थोड्या वेळासाठी मला कॉलेज मधून  निघायला विलंब होणार होता. आज  खूप दिवसानंतर पहिल्यांदा मी गाडी आणली होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हते आणि त्यात कळल तिलाही तसाच काही वेळ होईल म्हणून.
                   माझ काम आटोपलं मी तिच्या जाण्याची वाट पाहत राहिलो. कुणास ठाऊक का आणि कुठून तर तिने आज माझ्या सोबत घरी जाव अशी इच्छा प्रकट झाली. मला कळत हि होत हे शक्य नाही पण मुर्खासारखा मी  तरीही आस लाऊन बसलो.
                 मन दुखणे हे आता नेहमीचेच झाले होते आणि त्याला कुणी सावरून घ्यायला येईल हि आशाहि आता धुसरमंद प्रकाशात नाहीशी होत चालली होती.  पण काय करणार मनाला किती समजवून सांगायचं म्हंटल तरी ते वागणार शेवटी लहन मुलासारख, हवीशी वाटत असलेल्या गोष्टीचा नाद तो करत राहणार आणि ती मिळत नाही तोवर रडत राहणार. आजही थोड तसच होत आल.

मला ती हवी होती पण तिला..................

ती बाहेर निघाली नि मी ही निघालो,
मी कॉलेजच Gate मागे सोडल आणि काही मुल मला लिफ्ट मागताना मी पहिली. त्यातल्या एकाला मी हात दिला. आणि  तसेही एकट जाण्यापेक्षा कुणी सोबत असल तर बर वाटत. काही गप्पा गोष्टी होतात. पण पुढे घडलेल्या ह्या गोष्टीने मला आज लिहायला पाडल.
                        मी ज्याला लिफ्ट दिली तो तिचाच Classmate होता, हे मला आधी पासून ठाऊक होत. पण तरीहि मी त्याला बसवून घेतल. त्याच नाव अंकुशराव. म्हणायला बाहेरगावी राहणारे... बाहेरगावी शिक्षण घेणारे.. तो बसला नि गाडी चालायला लागली.  त्याने पहिलच वाक्य तोंडातून काढल  आणि मला काय करू नि की नाही अस झाल तो म्हणाला,

''दादा समोरच्या Van मध्ये माझी GF बसलेली आहे आपण पुढे निघायचं का त्यात बसलेले काही शिक्षकही लक्ष ठेवून असतात.'' Van मध्ये स्नेहलता मागे बसलेली मला दिसली.  त्याच वाक्य बोलून झाल्यावर मला त्याला गाडीच्या खाली उतरून चालत यायला सांगायची इच्छा झाली.

                          आज हि परिस्थिती माझ्यावर का  चालून आली, कुणास ठाऊक. पण त्या सोबत तिच्या बद्दल झालेल बोलण मला दुखावून गेल. आणि हि संध्याकाळही अंधारात आणि तिच्या आठवणींत विरून गेली.........

                        मी विचारात पडलो  आपण  करायला तरी की हवं होत.  त्याला सर्व सांगायला हव होत कि त्याला बसवूनच घ्यायला नको होत. मि मनात  इच्छा ठेवून बसलो कि ती आज माझ्या गाडीवर बसून सोबत येइल. पण सार काही उलटं झाल.

                           समोर जाऊन त्याला उतरवल आणि पाउस सुरु झाला.  मला माहित होत पाऊस पडणार म्हणजे आज काहीतरी स्नेहलते बाबत घडणार आणि एवढ सार घडून आल . त्याला माझ्यात आणि स्नेहलतेत काही घडवायचं असल कि तो हजेरी लावायचा. हि सलग पाचवी वेळ पाऊस येण्याची.  मी  परत तिची नजरभेट व्हावी  म्हणून काही वेळ पावसात तीथेच थांबलो पण ती आली नाही. शेवटी तिच्या साठवलेल्या नजरभेटी आठवून मी तिथून निघून गेलो.



आवडल्यास कंमेंट जरूर करा


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास