थोडं मनातलं .... फक्त तुझ्यासाठी (कविता सातवी)
तुझं नि माझं एक
मैत्रीचं नातं असावं.....
मग त्यात आपल्या शिवाय
दुसरं कुणीच नसावं....०१
सांगायचं बरंच काही आहे
म्हणून आज बोलवून घेतलं तुला....
तुझ्याशी मैत्री करायला मन किती
आतुरलय हे दाखवायचं होत तुला....०२
कधी कधी खूप वाटायचं
माझीही एक लाडकी मैत्रीण असावी....
ती सोबत असताना मग
कशाचीच भ्रांत नसावी....०३
बघ जमेल का तर
माझ्याशी मैत्री करायला....
जगाच्या पलीकडे
थोडं वेगळं रहायला....०४
तुझ्या होकाराची
मी वाट पाहिल.....
मैत्रीची साथ देशील
एवढीच इच्छा मनी ठेवील....०५
thanksss आशिष दा
ReplyDeleteThank you vaishnavi
ReplyDeleteKhupch chan 👌👌👌👌
ReplyDelete