माझी ती आणि तिचा तो
गोष्ट दोघांची. कधीही एकमेकांचे होऊ न शकणाऱ्यांची. नजरभेटी एक झाल्या पण मनं एक होता होता राहून गेल. गोष्ट स्नेहलता आणि मिलिंदची . मनाला वयात मोजता येत नाही त्यामुळे तो कुणावर जाऊन बसेल याचा नेम नाही. बागेतून फिरताना फुलावरही तो प्रेम करून बसतो आणि ते फुल कोमजताना पाहिलं कि त्याला विसरून जातो. ह्यांच्याही गोष्टीत थोडे असेच झाले. मिलिंदने काहीही न विचार करता आपले मन तिला देऊ केले. कहाणी पुढे कॉलेजचं शिक्षण चालू असताना चौथ्या वर्षात शिकणाऱ्या मिलिंदाचे मन एका पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीवर प्रेम करायला आतुर झाले होते... तिच्या प्रेमात तो हळू हळू एकरूप होत होता.. त्या निमित्ताने मिलिंदचे कॉलेज ला जाणेही नियमित झाले होते.रोज कॉलेजला जाण्या येण्यासाठी बस एकच असल्यामुळे ते एकप्रकारे एकमेकांच्या जवळच होते. ...