माझी ती आणि तिचा तो
गोष्ट
दोघांची. कधीही एकमेकांचे होऊ न शकणाऱ्यांची. नजरभेटी
एक झाल्या पण मनं एक होता होता राहून गेल. गोष्ट स्नेहलता आणि मिलिंदची. मनाला
वयात मोजता येत नाही त्यामुळे तो कुणावर जाऊन बसेल याचा नेम नाही. बागेतून फिरताना फुलावरही
तो प्रेम करून बसतो आणि ते फुल कोमजताना पाहिलं कि त्याला विसरून जातो.
ह्यांच्याही गोष्टीत थोडे असेच झाले. मिलिंदने काहीही न विचार करता आपले मन तिला
देऊ केले. कहाणी पुढे कॉलेजचं
शिक्षण चालू असताना चौथ्या वर्षात शिकणाऱ्या मिलिंदाचे मन एका पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीवर प्रेम करायला आतुर झाले होते... तिच्या प्रेमात तो हळू हळू एकरूप
होत होता.. त्या निमित्ताने मिलिंदचे कॉलेज ला जाणेही नियमित झाले होते.रोज
कॉलेजला जाण्या येण्यासाठी बस एकच असल्यामुळे ते एकप्रकारे एकमेकांच्या जवळच होते.
नुकतीच नवीन सत्राची सुरुवात झालेली होती. हळू हळू एकमेकांचं समोरा समोर येणही
सुरू झालं. एकमेकांच्या नजराही एक होत गेल्या पण दोघांच्या तोंडून शब्द काही उमटत
नव्हते.. जवळपास पुढे एकमेकांशी काहीही न बोलता फक्त नजरभेटीच होत होत्या.. ह्या
अनोळखी नात्याचं मैत्रीत रूपांतर व्हायला काही नवीन घडणे गरजेचे होते.
अनोळखी नात्याचं मैत्रीत रूपांतर व्हायला काही नवीन घडणे गरजेचे होते.
शेवटी
मिलिंदने तीच्या मैत्रिणीकडे आपल्या मैत्रीचा प्रस्ताव पाठवला. त्याच्या दुसऱ्या
दिवसाची संध्या मिलिंदने त्याच्या शब्दांत अशी मांडली,
"आज मी इथेच थांबणार काळोख होई पर्यंत ... निरोप पाठवून एक दिवस
संपुन पुढला दिवस सुरू होणार होता... निरोपाचा काय झालं, तिच्या पर्यंत तो पोहचता झाला की नाही, तिने त्यावर विचार केला असेल का ... अशी अनेक अनुत्तरित प्रश्न
मला भेडसावत होती... मी त्यांची उत्तर शोधू तरी तशी, सोबत कुणी
नव्हतं ... गरज वाटत होती कुणाची तरी.... मला
तिच्याशी बोलता येत नव्हतं पण काय करू... माझ्या समोर परिस्थितीच तशी चालून आली
होती... एव्हाना मी बाकीच्यांशी मन मोकळेपणाने बोलू शकत होतो, पण ती दिसताच तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि ठोके ही नुसते
घाबरवून सोडायचे. धीर देणाराही कुणी सापडेना.. शेवटी एकटा जीव सदाशिव अशी गत झाली
होती माझी......
तिच्या नकळत टिपलेल्या काही गोष्टी हळू हळू हरवत
चालल्या होत्या .. मनात एकदम धसका आला... त्यानीही घाबरवून सोडलं.. वाटलं आपण चुकत
तरी नाही आहोत ना.... मला कळत नव्हतं नेमकं कुठलं पाऊल मी उचलायला हवं....... पण
एक भाभळी आशा मनात घर करून बसली होती.. ती येईल म्हणून... महिना होत आला पण आजही
तिची वाट पाहण्याशिवाय दुसर काहीच माझ्या हाती नव्हतं.....
"खरंच..........ती येईल का
पण ??
दिवस असेच जात होते. दिवसभर तिचा चेहरा पाहता यावा म्हणून कॉलेज
मध्ये हिंडत रहायचा आणि रात्रभर तिच्या
स्वप्नांत रमायचा. एके संध्याकाळी मिलिंद असाच तिच्या आठवणींत
गुंतलेला होता तेव्हाची हि त्याच्या शब्दांतली आठवण,
"संध्याकाळची वेळ ती, चहाचा कप
हाती घेऊन बाल्कनीला उभा होतो. रिमझीम पावसाच्या
सरी सुरू होत्या... तेवढयात एक थेंब चहाच्या कपात येऊन विसावला...आणि तिची आठवण
झाली.... पाऊस नेहमीच तिची भेट होत रहावी म्हणून मला साथ देत आला..तिच्या
नजरभेटिंची चित्रफीत तिच्या अनुपस्थितीत डोळ्यांपुढून चालून येत असे...पावसाचं आणि
माझं चांगलंच स्नेह वाढलं होत..पण तिच्यासोबत स्नेह वाढाव म्हणून मी आतूर झालोय.. वेळोवेळी येऊन ज्या प्रकारे पाऊस दाद द्यायचा, त्यावरून जणू तो ही मिलनाची वाट पाहत असावा, असे वाटे. आज निरोप देऊन तिसरा दिवस उलटणार होता, तिची वाट पाहणंही थांबत नव्हतं, विरहाच्या
या दुर्दैवी काळाला तिने थारा द्यावा एवढीच इच्छा मनात होती...
आजची संध्याकाळ इच्छा नसूनही विरहमय होत चालली होती..पण
पावसाच्या भेटीने थोडा धिर आला आणि तिच्या आठवणींत चहा संपला"
शेवटी स्नेहलते बाबत आपलं काही होईल अशी आशाही मिलिंदला नाहीशी होताना दिसत होती, पण तिच्यात गुंतलेलं मन बाहेर निघायला तयार होत नव्हतं. समोर
अश्या खूप गोष्टी घडल्या, ज्यात ते एकमेकांसमोर वेगवेगळ्या
कारणांनी समोर येत होते. तिच्या आठवणींचं रूपांतर आता विरहात झालं होत, त्यावर मिलिंद लिहितो,
"एक
महिन्याच्या काळ तो.....आम्हा दोघांच्या नजरा ही जवळपास एक होत गेल्या, पण ह्या सर्व गोष्टी अल्पायुषी
ठरल्या.... मी तिची प्रत्येक नजरभेटी जणू जपून ठेवत होतो.. कारण मी ठरवून बसलो होता...
जणू ह्या गोड आठवणी पुढे आठवताना अलगद आनंद देऊन जातील...आम्ही दोघे एकमेकांच्या
डोळ्यात पाहत असो पण मनात कधी पाहता आलं नाही...एकामागून एक दिवस उलटत गेले..आणि
दुरावा निर्माण होत गेला... कुणाशी बोलताना मन घाबरतं नसे पण नेमकं स्नेहलता समोर
असता आपला खेळ सुरु करायचा. मी प्रयत्न करायचो पण मन मात्र मागे ओढत
असायचं....
ती समोर असूनही माझी होत नाही... अस मी म्हणत रहायचो पण प्रयत्न कधी
करता आले नाही. राग तरी कुणावर कसा आणि का
काढायचा हे सुद्धा कळत नव्हतं. . माणसाला
वेळ गेल्यावर अक्कल येते... हे इथेही मला जाणवलं ... आज सर्व काही बिनसलंय...
काहीच हाती उरलेलं नाही.. ती ही
नाही आणि वेळ ही नाही...माझा आळशीपणा मलाच भोवला..आणि वेळ गेल्यावर तो कळतोय.. ती
गेली आणि मी ही दुःखाच्या डोहात उडी मारली...
विरहमय आयुष्याला सुरुवात झाली
होती. त्याला विरहात रमेनास होत होतं. पण सर्व काही बांधून ठेवल्या
सारखं वाटत होत...
❤मिलिंद सोबत एक प्रसंग घडतो ज्यात त्याला तिला भेटता येत होत, तो
प्रसंग त्याच्याच शब्दांत
"तिची आठवण मनात सारखी सारखी सलत होती. थोड बाहेरून फिरून याव अशी मनी इच्छा
झाली. भावाला सोबत घेऊन कुठे
तरी जाव अस ठरवल. आणि
ताच्या घरी पोहचलो. तितक्यात मित्र प्रणव त्याचा फोन आला आणि त्यांनी कळवल कि ती तिकडे जात आहे, तुझ्या घरासमोरून ती पुढे निघाली आहे म्हणून. एवढ ऐकल आणि मी माझी सर्व चक्र फिरवली.
मला तिची आणि तिच्या
नजरभेटींची गरज होतीच. सलग सुट्ट्यांमुळे मला कंटाळा
आला होता, घरात बसून राहण्याचा.
आणि त्यात अशी बातमी मिळाल्यावर मला हि संधी गमवायची
नव्हती. ती पोहचायच्या आधीच
मी तिथे हजेरी लावली आणि तिच्या येण्याची वाट पाहत राहिलो.
वाट पाहणे संपले. ती
समोरून जात होती, नजरभेटी परत एक होत होत्या. पण दुरावा कायम होता.
आपल्यात काही नसून सुद्धा
तू माझ्याकडे का पाहत रहाव? या प्रश्नच उत्तर मला मिळत नव्हत. पुढे
कितीतरी नजरभेटी अश्याच होत गेल्या आणि
मी त्यांना साठवत गेलो. त्या २ तासांनी मला पुढल्या
काही दिवसांसाठीच्या आठवणी
तयार करून दिल्या."
जस जसे दिवस पुढे निघत होते तस तसे मिलिंदचेही तिच्यापासून दूर जाणे वाढत
होते पण फक्त नजरेने .तीच नजर जिने आधी दोघांना जवळ आणू पाहल होत. मनाने मिलिंद अजूनही तिचाच होता.
प्रत्येक कहाणीला एका नकारात्मक पात्राची गरज का असते कुणास
ठाऊक पण मिलिंदच्या कहाणीतही कुणीतरी होतच. मिलिंदच्या नकळत स्नेहलतेच विरुद्ध
दिशेला वाढलेलं लक्ष त्याला त्रासदायी ठरत होत..
अशाच एका प्रसंगी मिलिंदची त्या नकारात्मक पात्रासोबत भेट घडली.. ती भेट पुढे
कॉलेज सुटूनही काही थोड्या वेळासाठी मला कॉलेज मधून निघायला विलंब होणार होता. आज खूप दिवसानंतर पहिल्यांदा मी गाडी आणली होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हते आणि त्यात कळल तिलाही तसाच काही वेळ होईल म्हणून.
माझ काम आटोपलं मी तिच्या जाण्याची वाट पाहत राहिलो. कुणास ठाऊक का आणि कुठून तर तिने आज माझ्या सोबत घरी जाव अशी इच्छा प्रकट झाली. मला कळत हि होत हे शक्य नाही पण मुर्खासारखा मी तरीही आस लाऊन बसलो.
मन दुखणे हे आता नेहमीचेच झाले होते आणि त्याला कुणी सावरून घ्यायला येईल हि आशाहि आता धुसरमंद प्रकाशात नाहीशी होत चालली होती. पण काय करणार मनाला किती समजवून सांगायचं म्हंटल तरी ते वागणार शेवटी लहन मुलासारख, हवीशी वाटत असलेल्या गोष्टीचा नाद तो करत राहणार आणि ती मिळत नाही तोवर रडत राहणार. आजही थोड तसच होत आल.
मला ती हवी होती पण तिला..................
ती बाहेर निघाली नि मी ही निघालो,
मी कॉलेजच Gate मागे सोडल आणि काही मुल मला लिफ्ट मागताना मी पहिली. त्यातल्या एकाला मी हात दिला. आणि तसेही एकट जाण्यापेक्षा कुणी सोबत असल तर बर वाटत. काही गप्पा गोष्टी होतात. पण पुढे घडलेल्या ह्या गोष्टीने मला आज लिहायला पाडल.

मी ज्याला लिफ्ट दिली तो तिचाच Classmate होता, हे मला आधी पासून ठाऊक होत. पण तरीहि मी त्याला बसवून घेतल. त्याच नाव अंकुशराव. म्हणायला बाहेरगावी राहणारे... बाहेरगावी शिक्षण घेणारे.. तो बसला नि गाडी चालायला लागली. त्याने पहिलच वाक्य तोंडातून काढल आणि मला काय करू नि काय नाही अस झाल
तो म्हणाला,
''दादा समोरच्या Van मध्ये माझी GF बसलेली आहे आपण पुढे निघायचं का त्यात बसलेले काही शिक्षकही लक्ष ठेवून असतात.'' Van मध्ये स्नेहलता मागे बसलेली मला दिसली. त्याच वाक्य बोलून झाल्यावर मला त्याला गाडीच्या खाली उतरून चालत यायला सांगायची इच्छा झाली.
आज हि परिस्थिती माझ्यावर का चालून आली, कुणास ठाऊक. पण त्या सोबत तिच्या बद्दल झालेल बोलण मला दुखावून गेल. आणि हि संध्याकाळही अंधारात आणि तिच्या आठवणींत विरून गेली.........
मी विचारात पडलो आपण करायला तरी की हवं होत. त्याला सर्व सांगायला हव होत कि त्याला बसवूनच घ्यायला नको होत. मि मनात इच्छा ठेवून बसलो कि ती आज माझ्या गाडीवर बसून सोबत येइल. पण सार काही उलटं झाल.
समोर जाऊन त्याला उतरवल आणि पाउस सुरु झाला. मला माहित होत पाऊस पडणार म्हणजे आज काहीतरी स्नेहलते बाबत घडणार आणि एवढ सार घडून आल . त्याला माझ्यात आणि स्नेहलतेत काही घडवायचं असल कि तो हजेरी लावायचा. हि सलग पाचवी वेळ पाऊस येण्याची. मी परत तिची नजरभेट व्हावी म्हणून काही वेळ पावसात तीथेच थांबलो पण ती आली नाही. शेवटी तिच्या साठवलेल्या नजरभेटी आठवून मी तिथून निघून गेलो.

मिलिंदने आपले
एकतर्फी प्रेम दुतर्फी करतानाचे केलेले प्रयत्न हे अधुरे होते, अपूर्ण होते, असे म्हणता येईल. मिलिंदच्या आयुष्यात स्नेहलता हि एका फुलपाखरासारखी आली होती, जी
काही वेळ फुलावर बसून उडून गेली, पण याचा आस्वाद न घेताच ..
Title Credit :- Pranav Pande
#स्नेहलता #मिलिंद #Story
thank you santosh bhau
ReplyDeleteमस्त👌👌
ReplyDelete