एक संध्याकाळ नदी काठी
"खूप दिवस होत अालेत आपली भेट झाली नाही.... आपण एकमेकांना पाहिलं सुद्धा नाही...कशी दिसतेस तू ?
मला जवळून बघायचं होत तुला.... भेटूया का आज संध्येला एका नदी काठी.... मनमोकळ्या गपा मारूया...."
एवढं बोलून मी फोन ठेवला...
ती खूप दिवसांनी भेटणार होती...म्हणून मन आनंदी होत.. आणि क्षणार्धात ती समोर असल्यागत मनात गप्पा सुरु झाल्या... जणू काही मनात ज्या प्रकारे तिच्याशी बोलता येत होतं तसंच प्रत्यक्षातही बोलत येईल यावर माझी खात्रीच झाली होती..
मी तयारीला लागलो .. आज जणू जगातल्या खास व्यक्तीला मी भेटायला जाणार होतो.....
संध्याकाळ झाली मी घरून निघालो....
ती येण्या आधी आपण पोहचावे म्हणून जरा घाई घाईने चालत होतो.... जवळच देऊळ होते.. कधी नाही ते आज दर्शन घेऊन आलो..देवळा समोरच्या ओट्यावर काही वेळ पहुडलो...सूर्यदेव परतीच्या मार्गावर होते... पाखरांचा किलकीलाट चालू होता...जमिनीवर चारही बाजूंना सुकलेल्या पानांचा सडा पडलेला होता.....नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा तो मंद आवाज सोबतीला संथ गतीने वाहणारा वारा ...मन मोहून घेत होता...या मोहून टाकणाऱ्या वातावरणात कुणाचीतरी साथ हवी होती... या निसर्गाचा आनंद द्वीगणित झाला असता...
तिची वाट पाहत पाहता नदीच्या पाण्यावर दगडांना तरंगवण्याचा प्रयत्न मी सूरु केला.
मी त्यात रमू लागलो पण इकडे वाट पाहणे काही शमत नव्हते...
आणखी थोडा वेळ निघून गेला...अलगदच कुणी पावलांचा आवाज होऊ नये म्हणून हळुवारपणे कुणीतरी माझ्याकडे येत असल्याचा अंदाज आला.. मी ही कळत नसल्यासारखे नाटक करत होतो...
ती जवळ आली नी मोगऱ्याचा सुगधं दरवळायला लागला, नेहमीप्रमाणे ती आजही केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा लावून आली होती.
तिने डोळे झाकले.. आणि ती म्हणाली "ओळख बघू कोण आहे तर ?"
माझ्या साठी काय कठीण असावं, असल्या प्रश्नाला उत्तर देणे.. पण तरीही मी काही वेळ तसाच थांबून राहिलो..
हळूच तिचा हात ओढत एकदम म्हणून टाकले,
"माझी सखी आणखी कोण!!"
शेवटी तीच असणार.. नाटकातल्या नटी सारखी ती आजही सजून आली होती... कुणालाही भुरळ पडेल असा तिच्या देखणा पेहराव होता...
तिला शेजारी बसवलं आणि विचारलं,
"काय इतका वेळ केलास किती वेळ झाला मी इथे दगडा पाण्यासोबत खेळतोय..
ती उत्तरली "मी वेळेतच आले तूच लवकर आलास वेळ बघ आधी...
अरे हो मीच लवकर आलो होतो... तुझ्या भेटीची ओढ लागली होती.. खूप दिवस झाले आपल्याला न भेटून, आज तरी जरा वेळ थांबशील ना?
ती:- नाही आज मला लवकर जायचं आहे, घरी खूप कामं आहेत तुला काय तू रिकाम्या...
नेहमी सारखच ती आजही मोजकाच वेळ माझ्यासाठी घेऊन आली होती... आणि मलाही त्यात भागवणे होते... कारण मी तिच्याशी फोन वर बोलत नसून ती प्रत्यक्षात माझ्या समोर होती.. त्यातच माझा आनंद होता....
ती:- कदाचित आपली ही शेवटची भेट ठरेल...
मी:- का ? तुला ह्या उचापती का सुचत आहेत आता..
मी चढ्या स्वरात विचारले
ती :- हो हे खरं आहे, कारण कदचित वडिलांना हे शहर सोडावे लागेल आणि मलाही ही...
ती सांगताना दुःखी होती पण मी मला तिच्या जाण्याचे जास्त दुःख होते...
मी:- मग आता आपण विसरायच एकमेकांना!, संपलं सगळं!, इतक्या वर्षांच नात असच तोडायच!!
ती:- नाही रे मी येईल ना कधी कधी इथे ... मग तू ही यायचं कधी माझ्या नव्या शहरी
मी:- हो तुला खूप सोप्प वाटतंय हे सारं इथे तिथे येऊन भेटायला... आज आपण एकाच शहरात असूनही आपल्यात एवढा दुरावा आहे... पाहतीयेस ना आपण किती दिवसांनी भेटतोय ते ,त्यातही तुझ्या वेळेच्या अटी..
हे बघ............ कितीही म्हंटल तरी आपल्याला पुढे तू गेल्यावर काल्पनिक जगात जास्त जगावं लागेल... जणू तू जवळ असल्याचे भास मला तयार करावे लागतील, मला त्यात रहावे लागेल... किती कठीण असेल ते.... तुला जाणवत तरी आहे का...
ती:- मग काय करू तूच सांग ना....शहर बदली होणे हे माझ्या हाती नाही.... घरी जे होईल त्यानुसार मलाही वागवेच लागेल ना..
मी:- ठीक आहे तुला जावेसे वाटत असेल तर तू जा
ती:- अस कस बोलू शकतोस तू....
मी: तसच बोलावं लागेल ना आता... कारण तुझ्या कडे दुसरा पर्याय नाही आणि माझ्याही कडे नाही...
आपल्यातल नातं टिकवायच असेल तर आपल्याला एकच करावे लागणार...
ती:- काय ?
मी:- बघ तू नव्या शहरात जाशील...तिथे तुझ्या नव्या ओळखी होतील...पण मी इथे एकटाच असेल माझं काहीच बदललेलं नसेल..माझ्यासाठी तूच माझी असशील....पण तुझ्या नव्या शहराने तुला नव्या सवयींमध्ये ओढून नेलं तर.
ती:- अस काही होणार नाही तुझा विश्वास आहे न माझ्यावर मग कशाला चिंता करायची.
मी:-ठीक आहे मी रोज तुझ्या मॅसेज वाट पाहेन.
ती:- चल मी जाते खूप वेळ झाला आहे.
मी:- bye...
ती तिथून निघून गेली... मी जरा वेळ तिथच बसुन रहायचं ठरवलं
कुणीतरी जोर जोरात मंदिराची घंटा वाजवत असल्याचं मला वाटलं...मी मागे वळून पाहतोच की हळूच वरून कुणी आपल्यावर पाणी शिंपडत आहे असं वाटलं..
अचानक माझे डोळे उघडले आणि समोर आईला पाहिले तेव्हा कुठे लक्षात आलं की आपण बिछान्यावरच पडून आहोत म्हणून.. आणि मंदिरातली घंटा वगैरे काही नसून आपला अलार्म आपल्याला उठवत होता, त्यात आपण उठत नसल्याचं पाहून आई पाण्याचा पेला हातात घेऊन आपल्या चेहऱ्यावर शिंपडत होती .एवढं सार झाल्यावर मग माझ्या लक्षात आलं की आपण एका स्वप्नात होतो, ती नदी, ती प्रेयसी, ती किलबिलणारी पाखर, तो मंदिराचा ओटा ह्या सर्व गोष्टी का ल्पनिकच होत्या आणि त्या काल्पनिकच राहिल्या..
आईने मला सर्व काही झाल्यावर उठवलं म्हणून हे सारं पाहता आलं कदाचित आईने मधातच उठवलं असत, तर एवढं सार घडलंच नसत.. प्रत्यक्षात प्रेयसी नसणाऱ्याला प्रेयसी असल्यागत ती स्वप्नात दिसली होती. एका काल्पनिक पण गोड स्वप्नाचा शेवट झाला.
मजेत, सुरळीत चालणाऱ्या नात्यात दरी निर्माण करायला परिस्थिती या रूपाने त्यांच्यासमोर ठाकली होती.. म्हणायला या नात्याला सुरंग लागला तो दुराव्या मुळेच ... असं म्हणता येईल...
#लेख #काल्पनिक #स्वप्न
msttt
ReplyDelete