गोष्ट नवीन आणि धनश्रीची (भावना तुमच्या शब्द माझे)
गोष्ट नवीन आणि धनश्रीची नवीन आजूनही तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.. तिच्या साठी काहीतरी लिहायचं आहे म्हणून त्यांनी मला सुचवलं तेव्हा भावना तुझ्या शब्द माझे या नवीन शिर्षकाखाली मी त्याची कहाणी माझ्या शब्दांच्या जोडीने मांडली. गोष्ट पहिली धनश्री तुला एक गोष्ट सांगायची जी गेली तीन वर्षांपासून मी सांगायचा प्रयत्न करत आलोय, ती आज तुझ्यासमोर मांडतोय.. सलग तीन वर्षे झाली मी तुला एकतर्फी नजरेने पाहतोय.. माहितीये तु मला ओळखत नसशील पण कदाचित मला कधीतरी पाहिले तर असेलच ना... त्या तीन वर्षात मी कितीतरी स्वप्न पहिली जी तुझ्यासोबत पूर्ण होतील म्हणून मी आपल्या एक होण्याची अजूनही वाट पाहतोय.. तू Poly 3rd yr ला असतानाच मला तू आवडली होतीस. तुझ्या देखण्या चेहऱ्याने मला जी भुरळ पाडली, त्यामुळे पुढले एक वर्ष तरी तुझ्या चेहऱ्यावर माझी नजर खिळत राहिली होती. तेव्हाच्या वेळी मी तुला फक्त माझ्या डोळ्यात भरत गेलो, आणि माझ्या स्वप्नांमध्ये तुला रंगवत गेलो.. त्या पूर्ण वेळेत मी तुझ्याबद्दल सर्वच काही माहिती करून बसलो होतो.....