माझं स्वप्न

आयुष्यात आपली कितीतरी स्वप्न असतात काही एकमेकांवर अवलंबून असतात तर काही खूप वेगवेगळी असतात.. माझी ही स्वप्न तशीच होती एकमेकांपासून वेगवेगळी .. त्यातून मंचावर सूत्र संचलनाची संधी मिळावी हे एक..इतर आणखी ही होते लेखक होण्याचे, क्रिकेटर बनण्याचे, पण सूत्र संचलनाच स्वप्न माझं पूर्ण झालं...आणि इच्छे पेक्षाही थोडं जास्तच मिळालं
कॉलेज च माझं शेवटचं वर्ष होतं. तस तर कॉलेज मध्ये गेली 5 वर्ष मी प्रयत्न करत आलो होतो सूत्र संचलन करण्याची संधी माळ मिळावी म्हणून.. पण या वर्षी ही संधी दडवता काम नये म्हणून मी चांगलीच तयारी केली.. आणि त्या मेहनतीचे फळ मला गोडच मिळाले..
‎ऑडिशन साठी आलेला 10 ते 12 झणांपैकी मला 30 पैकी सर्वात जास्त 26 गुण मिळाले. आणि त्यात मी माझा भाषा मराठी सांगितली.. त्यामुळे माझी संधी ही मलाच मिळाली.
‎हळू हळू सराव सुरू झाला आणि मॅम नि उदघाटन आणि स्वागत समारोह म्हणजेच सुरुवातीच्या 15 मिनिटांची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. त्याच बरोबर 10 act चे ही सूत्र संचलन मला मिळाले.
‎मराठी ची मला चांगलीच साथ होती. हे मॅडम जाणून होत्या. त्यामुळे पहिल्या 15 मिनिटांचा सारा खेळ मला लिहून आणायला सांगितला..आणि तो मी लिहून काढला
‎स्नेहसंमेलनाचा दिवस. मी सर्वांसमोर उभा रहायला आतुर होतो..त्याच बरोबर आपल्या एका स्वप्नाची पूर्तता होताना पहायला आपली आई सुद्धा आपल्या समोर आहे.. ह्याचा आनंद वेगळाच.. कधी कधी तर हा आनंद गगनात मावेल की नाही, हे सुद्धा कळत नव्हतं..
‎सार काही सुरळीत पार पडलं. कुठे चुका केल्याही.. पण त्या चुकाही मला काहीतरी शिकवून गेल्या. मला संधी दिल्या बद्दल मी अझरा मॅम, राशी मॅम आणि विजया मॅम ह्यांचा सदैव ऋणी असेल....


Comments

Popular posts from this blog

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास