ती आणि न उमललेले शब्द


ती आपली होणार नाही! या जन्मी तरी!! ह्या वाक्याची किंमतच जणू मोजता येणार नाही...ती समोर असायची किती तरी वेळ.. जणू आपले हात मैत्रीच्या नात्याने बांधून ठेवले असावे तिने. त्या मैत्रीतही जीव असावा त्याचा. ती समोरून जाताना मनात तिच्याशी बोलता यावं म्हणून मोठ्ठा निबंध तयार होत असायचा.  पण एखाद्या प्रसंगी ती समोर आली की मनातल्या ह्या निबंधातला एक शब्दही ओठांवर उमटत नसायचा, त्याचे हे एकतर्फी प्रेम शेवटपर्यंत कदाचित एकतर्फीच रहावे. दूतर्फीप्रेमा पेक्षा एकतर्फी प्रेमात जास्त ताकद असावी, कारण ते कधीच संपणारे असावे, दूतर्फी प्रेमाला कुठेतरी सीमा असतेच. तिच्या बाबतीत बोलायला ती आणि त्याचे मन एवढेच लोक जगात अस्तित्वाला असायचे. मनात राहून राहून असंख्य विचार तिच्या बाबतीत घोळ घालायचे. ते विचार लिहून काढायचे म्हंटल्यास एक पुस्तक लिहून पुरे व्हायचे.
 रोजच्या सहवासात माणसांचा सहवास कमीच तर एकटेपणा जास्त जवळीक साधायचा. एकटे राहणे सोयीस्कर वाटायचे, कारण त्या एकटेपणाला तीची साथ जुळून यायची. रोज रात्रीला वेळ तिच्या आठविणींसोबत निघायचा, अधून मधून मन रडत असे, ते डोळ्यांतले अश्रू पहायला ती समोर असती तर...?? ‎दिवसाचा उजेड ही नकोसा वाटायचा जणू तो प्रकाशही प्रत्येक वेळी जाणीव करून देत असे..ती परकीच असावी म्हणून. ‎पाहताना तीचं गोड हसणं मनाला मोहून टाकायचं. लहानपणी हट्ट केल्यास गोष्ट मिळत असे मग ही गोष्ट मिळाली असती तर. आता आयुष्य खूप बिकट झालंय. कदाचित ती समोर कधीच आली नसती तर, परत आधी सारख जगता आलं असतं तर, किती बरे झाले असते. पण आता सध्यस्थीतीत येताना जाताना ती समोर असावी तिला एकदातरी पहायला मिळावे म्हणून मन नेहमीच घुटमळत रहायचे.
कधी कधी प्रेम खूप विचित्र गोष्ट असल्याचा भास होतो. तरी हा भास खरा होता कारण एकतर्फी प्रेमात ती नसायची, तो आणि त्याच मन एवढेच तिच्या बाबतीत विचार करत रहायचे, ती स्वप्नांतल्या परींसारखी भासायची. तिची सोबत मिळावी म्हणून केलेले प्रयत्न नेमीच निष्फळ ठरायचे. कदाचित तिसरी व्यक्ती तिथे मधात उभी असावी, ‎ ती मिळत नाही आणि आपले मनही तीच्यातून निघत नाही, हे पाहता त्याने चंद्राला आपली सखी मानले. पण तो ही रोज पूर्ण समोर येत नसायचा. तेव्हा ठरवलेल्या गोष्टी त्याच्याशी ती समजून बोलताही येत नसे.
 कधी कधी चंद्रापाशी एक चांदणा येऊन उभा रहायचा. त्याला पाहताच हा रागा भरायचा आणि चंद्राला पाहत रडत बसायचा. आपण समोरच्या व्यक्ती साठी काय काय करतोय हे जरी तिला कळले तर कुठे सुरेख काम होईल.ह्या एकतर्फीप्रेमाच्या प्रवासाचा अंत होणे कठीणच पण कदाचित तिने एकदा तरी वळून पाहिले असते तर. ह्या वाळवंटी आयुष्याची तहान भागली असती. आयुष्यभर हसत हसत दुःख साजरं करणाऱ्या व्यक्तीला एखादातरी सुखद क्षण साजरा करायला मिळाला तर आयुष्याचा खरा अर्थ त्याला कळून येईल....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास