Posts

Showing posts from 2017

माझी ती आणि तिचा तो

                                         गोष्ट दोघांची. कधीही एकमेकांचे होऊ न   शकणाऱ्यांची.   नजरभेटी एक झाल्या पण मनं एक होता होता राहून गेल. गोष्ट   स्नेहलता   आणि   मिलिंदची . मनाला वयात मोजता येत नाही त्यामुळे तो कुणावर जाऊन बसेल याचा नेम नाही. बागेतून फिरताना   फुलावरही तो प्रेम करून बसतो आणि ते फुल कोमजताना पाहिलं कि त्याला विसरून जातो. ह्यांच्याही गोष्टीत थोडे असेच झाले. मिलिंदने काहीही न विचार करता आपले मन तिला देऊ केले.   कहाणी पुढे   कॉलेजचं शिक्षण चालू असताना चौथ्या वर्षात शिकणाऱ्या मिलिंदाचे मन एका पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीवर प्रेम करायला आतुर झाले होते... तिच्या प्रेमात तो हळू हळू एकरूप होत होता.. त्या निमित्ताने मिलिंदचे कॉलेज ला जाणेही नियमित झाले होते.रोज कॉलेजला जाण्या येण्यासाठी बस एकच असल्यामुळे ते एकप्रकारे एकमेकांच्या जवळच होते.                        ...

एक संध्याकाळ नदी काठी

"खूप दिवस होत अालेत आपली भेट झाली नाही.... आपण एकमेकांना पाहिलं सुद्धा नाही...कशी दिसतेस तू ? मला जवळून बघायचं होत तुला.... भेटूया का आज संध्येला एका नदी काठी.... मनमोकळ्या गपा मारूया...." एवढं बोलून मी फोन ठेवला... ती खूप दिवसांनी भेटणार होती...म्हणून मन आनंदी होत.. आणि क्षणार्धात ती समोर असल्यागत मनात गप्पा सुरु झाल्या... जणू काही मनात ज्या प्रकारे तिच्याशी बोलता येत होतं तसंच प्रत्यक्षातही बोलत येईल यावर माझी खात्रीच झाली होती.. मी तयारीला लागलो .. आज जणू जगातल्या खास व्यक्तीला मी भेटायला जाणार होतो..... संध्याकाळ झाली मी घरून निघालो.... ती येण्या आधी आपण पोहचावे म्हणून जरा घाई घाईने चालत होतो.... जवळच देऊळ होते.. कधी नाही ते आज दर्शन घेऊन आलो..देवळा समोरच्या ओट्यावर काही वेळ पहुडलो...सूर्यदेव परतीच्या मार्गावर होते... पाखरांचा किलकीलाट चालू होता...जमिनीवर चारही बाजूंना सुकलेल्या पानांचा सडा पडलेला होता.....नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा तो मंद आवाज सोबतीला संथ गतीने वाहणारा वारा ...मन मोहून घेत होता...या मोहून टाकणाऱ्या वातावरणात कुणाचीतरी साथ हव...

थोडं मनातलं .... फक्त तुझ्यासाठी (कविता सातवी)

Image
तुझं नि माझं एक मैत्रीचं नातं असावं..... मग  त्यात आपल्या शिवाय दुसरं कुणीच नसावं....०१ सांगायचं बरंच काही आहे म्हणून आज बोलवून घेतलं तुला.... तुझ्याशी मैत्री करायला मन किती आतुरलय हे दाखवायचं होत तुला....०२ कधी कधी खूप वाटायचं माझीही एक लाडकी मैत्रीण असावी.... ती सोबत असताना मग  कशाचीच भ्रांत नसावी....०३ बघ जमेल का तर  माझ्याशी मैत्री करायला.... जगाच्या पलीकडे थोडं वेगळं रहायला....०४ तुझ्या होकाराची  मी वाट पाहिल..... मैत्रीची साथ देशील एवढीच इच्छा मनी ठेवील....०५

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

Image
दोन शब्द             सहसा कुठल्याही विषयावर लिहिताना मी त्या विषयी  कुणी लिहिले असता त्यावर लिहिणे टाळतो. पण ह्या वेळी परीस्थिती वेगळी होती.  MS DHONI नावाच्या जगज्जेत्या व्यक्तीवर मला लिहिणे होते.  MS DHONI वर  अनेक पुस्तके लिहूनही झालीत, पण एका चाहत्याच्या नजरेने मी लिहिण्याचे ठरवले..             लिहिता लिहिता त्यानी केलेल्या विश्वविक्रमांच वर्णन कितीही केले तरीही मन भरत नसे... पण प्रयत्न केले सर्व काही या लेखात सामावून घेण्याचे.. तुम्हाला आवडेल एवढीच आशा.. धन्यवाद.                   आज  जगात प्रत्येकाला भुरळ पडणारा तू माझा आवडता खेळाडू आहेस, याचा मला मनापासून अभिमान आहे. जगात तुझ्या स्वभावाने, तुझ्या खेळण्याचा विलक्षण पद्धतीने आणि तुझ्या नेतृत्व करण्याचा शैलीने एक वेगळी ओळख निर्माण झाली. एका लहान शहरातून येत तू पूर्ण जगाला वेड्यात काढलस. आज तुझा चाहता, तुझी एक झलक मिळावी म्हणून कुठल्याही स्तरावर जायला तयार होतो. त...

स्नेहलता (भाग चौथा आणि पाचवा)

भाग चौथा                                       मी स्नेहलता नावावर लिखाण  ३ भागां मधेच संपवायला नको होत, हे मला आता कळून चुकल. कारण पुढली ६ महिने ती माझ्या समोर असेल, त्यामुळे तीच्यावर लिहिणे एवढ्यात संपणे शक्य नव्हतेच. दि २९ सप्टेंबर २०१७ ची गोष्ट,                                    मी ३रा भाग संपला म्हणून,  निवांत बसलेलो होतो.  तिची आठवण मनात सारखी सारखी सलत होती. थोड बाहेरून फिरून याव अशी मनी इच्छा झाली.  भावाला सोबत घेऊन कुठे तरी  जाव अस ठरवल. आणि ताच्या घरी पोहचलो. तितक्यात मित्र प्रणव त्याचा  फोन आला आणि त्यांनी कळवल कि ती तिकडे जात आहे, तुझ्या घरासमोरून ती पुढे निघाली आहे म्हणून. एवढ ऐकल आणि मी माझी सर्व चक्र फिरवली.                                         मला ति...

बोचलीच पाहिजे (कविता सहावी)

                    बोचलीच पाहिजे ह्याला त्याची काळजी नाही,  त्याला ह्याची काळजी नाही म्हणता म्हणता देशाचीही कुणाला काळजी नाही......१ भेसळयुक्त राजकारणाची, रीत तुम्ही जपली अच्छे दिनाच्या नावाखाली किती हो तुम्ही मत लाटली.....२ देश विकोपाला जातोय, लक्ष नाही कुणाचं महागाई चांगल्या साठीच वाढली, अस म्हणून कस चालायचं......३ वेळ आली जेव्हा, तुमची काम दाखवायची.... तेव्हाच का जुनी प्रकरण, तुम्ही वर काढायची.....४ स्वतःच्या चूक झाकत, दुसऱ्याच पहावं तुम्ही वाकून जुने खटले वर काढत, आपलेच दुष्कर्म ठेवता तुम्ही झाकून.....५ घटना घडली तर, तुम्ही तोंड झाकून पळ काढता उद्घाटनाला तुम्हीच तोंड वर करून पळत येता.....६ करतोय काम एक, श्रेय लाटतायेत हजार तुमच्या या भानगडीत, सामान्य माणूस होतोय बेजार ....७ समोर शेतकरी दिसतोय मरताना, वाटत काहीच ह्यांना नाही दगड मातीचे हे, लाज ह्यांना थोडीही वाटत नाही.....८ गाजा वाजा केला हो किती तुम्ही येताना लाज कशी वाटली नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणताना....९...

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास ह्याला प्रवास म्हणाव की फुटक्या नशिबाच कारण म्हणावं..... एन आयुष्य संभाळत , त्याला नवीन वळणावर आणायची वेळ येते .. .. साथीला साथ देणारा कुणी तरी अचानक सोडून जातं..... मग जीवना पेक्षा मरण जवळच वाटू लागतं. शेवटी कुणीच कुणाचं नसत ह्यावर विश्वास बसतो.  कदाचित देवाने परिस्थिती हाताळण्याची मुभा माणसाला दिली असती , तर त्रासून सोडण्याऱ्या ह्या गोष्टींना आयुष्यापासू न लांब लांब सोडून ठेवलं असत.... जेव्हा कुणी सोडून जात .... मग त्यावेळी   माणसाला त्याचे सोबती ही त्रासदायी वाटतात आणि तो कागदांच्या स्वाधीन होतो.. त्यात कवी संचारतो..... त्याच्या कवीपणाला जणू ती वाव मिळावा म्हणूनच त्याच्या आयुष्यात येऊन निघून जाते......... कवितेतल्या त्या विरहित शब्दांना हिऱ्याहूनही अधिक मोल असावे... समोरच्या व्यक्तीच काळीज विघळून टाकणारे ते शब्द जणू ती त्याच्या स्वाधीन करायला आलेली असावी .. ... त्याच्यात ला कवीपणा प्रत्येक गोष्टीला अश्याप्रकारे रंगवतो की जणू ते ही त्याच्या दुः खा त शामिल आहेत... पावसालाही तो आपल्या मैफिलीत सामील करून घेतो... ...