Posts

Showing posts from January, 2018

मन माझं.......

मला कळतंय आणि जाणवत सुद्धा आहे की आज मी आयुष्याकडून खूप काही अती प्रमाणात मागतोय. ज्या गोष्टी माझ्या नशिबी नसुन सुद्धा मी त्या मागत फिरतोय.. काय करणार मी शेवटी ठरलो माझ्या मनाचा गुलाम. तो सांगत राहतो नि मी करत फिरतो.. कधी कधी आपल्याच बद्दलची गोष्ट कुणी सांगून जात, की आपला स्वभाव असा आहे तसा आहे तेव्हा थोडं दुःख होत आणि आपल्याच स्वभावावर आपल्याला विचार करायला भाग पाडत.. ‎ माझंच बघा ना मी फक्त स्वतःचा विचार करतो अस माझ्या निकटवर्तीय मला सांगून जातो.. तेव्हा मीच बुचकळ्यात पडतो.. कारण माझ्या परीने मी माझी वाटणारी माणसं जोडण्याचा प्रयत्न करत होतो.. कारण मी खूप एकटा पडलोय.. हे कुणाला कस सांगू...हाच प्रश्न मला खूप भेडसावतो.. उत्तर कुठे मिळेल ते मला माहिती नाही.. काल्पनिक जग खूप मोठं भासत पण प्रत्यक्षात ते तीन चार लोकांच्या वर माझं जग जाणवत नाही. त्यांना गमावण मला परवडणारं नाही.. त्यामुळे मी कसा स्वार्थी असेल.. समोरचा रुसून बसणार नाही, म्हणून मला रागवावसही वाटत नाही..तरी मी स्वार्थी ठरलो... जगाच्या नजरेत आपल्याला आपण जसे आहोत तसे दाखवता का येत नाही,