Posts

Showing posts from October, 2017

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

Image
दोन शब्द             सहसा कुठल्याही विषयावर लिहिताना मी त्या विषयी  कुणी लिहिले असता त्यावर लिहिणे टाळतो. पण ह्या वेळी परीस्थिती वेगळी होती.  MS DHONI नावाच्या जगज्जेत्या व्यक्तीवर मला लिहिणे होते.  MS DHONI वर  अनेक पुस्तके लिहूनही झालीत, पण एका चाहत्याच्या नजरेने मी लिहिण्याचे ठरवले..             लिहिता लिहिता त्यानी केलेल्या विश्वविक्रमांच वर्णन कितीही केले तरीही मन भरत नसे... पण प्रयत्न केले सर्व काही या लेखात सामावून घेण्याचे.. तुम्हाला आवडेल एवढीच आशा.. धन्यवाद.                   आज  जगात प्रत्येकाला भुरळ पडणारा तू माझा आवडता खेळाडू आहेस, याचा मला मनापासून अभिमान आहे. जगात तुझ्या स्वभावाने, तुझ्या खेळण्याचा विलक्षण पद्धतीने आणि तुझ्या नेतृत्व करण्याचा शैलीने एक वेगळी ओळख निर्माण झाली. एका लहान शहरातून येत तू पूर्ण जगाला वेड्यात काढलस. आज तुझा चाहता, तुझी एक झलक मिळावी म्हणून कुठल्याही स्तरावर जायला तयार होतो. तूझ्या स्वभावानुसार विरोधकास उत्तराव हे चाहत्यांनी तुझ्याकडून चांगलच समजून, शिकून घेतल.  त्यामुळे आज कुठलाही विरोधक समोर आला तर त्यालाही तुझ

स्नेहलता (भाग चौथा आणि पाचवा)

भाग चौथा                                       मी स्नेहलता नावावर लिखाण  ३ भागां मधेच संपवायला नको होत, हे मला आता कळून चुकल. कारण पुढली ६ महिने ती माझ्या समोर असेल, त्यामुळे तीच्यावर लिहिणे एवढ्यात संपणे शक्य नव्हतेच. दि २९ सप्टेंबर २०१७ ची गोष्ट,                                    मी ३रा भाग संपला म्हणून,  निवांत बसलेलो होतो.  तिची आठवण मनात सारखी सारखी सलत होती. थोड बाहेरून फिरून याव अशी मनी इच्छा झाली.  भावाला सोबत घेऊन कुठे तरी  जाव अस ठरवल. आणि ताच्या घरी पोहचलो. तितक्यात मित्र प्रणव त्याचा  फोन आला आणि त्यांनी कळवल कि ती तिकडे जात आहे, तुझ्या घरासमोरून ती पुढे निघाली आहे म्हणून. एवढ ऐकल आणि मी माझी सर्व चक्र फिरवली.                                         मला तिची आणि तिच्या नजरभेटींची गरज होतीच. सलग सुट्ट्यांमुळे मला कंटाळा आला होता, घरात बसून राहण्याचा. आणि त्यात अशी बातमी मिळाल्यावर मला हि संधी गमवायची नव्हती. ती पोहचायच्या आधीच मी तिथे हजेरी लावली आणि तिच्या येण्याची वाट पाहत राहिलो. वाट पाहणे संपले. ती समोरून जात होती, नजरभेटी परत एक होत होत्या. पण दुरावा कायम होता

बोचलीच पाहिजे (कविता सहावी)

                    बोचलीच पाहिजे ह्याला त्याची काळजी नाही,  त्याला ह्याची काळजी नाही म्हणता म्हणता देशाचीही कुणाला काळजी नाही......१ भेसळयुक्त राजकारणाची, रीत तुम्ही जपली अच्छे दिनाच्या नावाखाली किती हो तुम्ही मत लाटली.....२ देश विकोपाला जातोय, लक्ष नाही कुणाचं महागाई चांगल्या साठीच वाढली, अस म्हणून कस चालायचं......३ वेळ आली जेव्हा, तुमची काम दाखवायची.... तेव्हाच का जुनी प्रकरण, तुम्ही वर काढायची.....४ स्वतःच्या चूक झाकत, दुसऱ्याच पहावं तुम्ही वाकून जुने खटले वर काढत, आपलेच दुष्कर्म ठेवता तुम्ही झाकून.....५ घटना घडली तर, तुम्ही तोंड झाकून पळ काढता उद्घाटनाला तुम्हीच तोंड वर करून पळत येता.....६ करतोय काम एक, श्रेय लाटतायेत हजार तुमच्या या भानगडीत, सामान्य माणूस होतोय बेजार ....७ समोर शेतकरी दिसतोय मरताना, वाटत काहीच ह्यांना नाही दगड मातीचे हे, लाज ह्यांना थोडीही वाटत नाही.....८ गाजा वाजा केला हो किती तुम्ही येताना लाज कशी वाटली नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणताना....९ सुरुवात कशीही असो, शेवट तर ठरलाय विकासाच्या ना