Posts

Showing posts from January, 2019

मैत्रीच्या वेलींवर प्रीतीची फुले...

दोन शब्द           वचनपूर्ती म्हणून सर्वात आधी मी तिच्यावर ही कथा लिहिण्याचे ठरवले. दिलेल्या शब्दांवर ठाम राहणे ह्या सवयीचा हा एक प्रकारे फायदाही आणि तोटाही. कथेलाही मला तिचेच नाव द्यावेसे वाटे पण तिच्या होकारा शिवाय शक्य नव्हते...           माझ्या लेखकी कारकिर्दीतील ही पहिलीच कथा असावी.. म्हणून थोडा आनंदही होतो आणि दुःखही. कारण एखादी गोष्ट आपल्याला मिळायची असते , जिच्यावर आपण मन लावून बसतो , पण ती मिळत नाही , तेव्हा दुःख होत आणि ते असहनीय असतं. आयुष्यात प्रत्येकाने कमवलंय आणि गमवलंय सुद्धा , पण माणसाचं हे जुलमी   मन त्याच्या आयुष्यात येणाऱ्या दुःखदायी गोष्टींकडेच जास्त लक्ष देण्याची संमती देतं.           ‎ आनंदी गोष्टी , ह्या अल्पायुषीच ठरतात , म्हणून लिहिता लिहिता सर्व लिहून झालं की मन एकदाच शांत होईल , या आशेने मी भर भर लिहायला सुरुवात केली... कारण माझ्याजवळ माझं मन हलकं करवून देणारा इतर कुणी व्यक्ती नव्हताच...           ‎ कथेत लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व प्रसंगांचा मी दिलखुलास पणे समावेश केला... मला कधी कधी प्रश्न पडायचा , या कथेला सध्यातरी शेवट

मला बहीण होती.....

हो मला एक बहिण होती, पण ती कशी दिसते, तिला माझी आठवण येत होती का, हे काही मला माहित नाही, पण हो मला एक बहीण होतीच....              कदाचित ती माझ्यासारखीच दिसत असावी, मी आईला म्हणायचो एखादा तरी फोटो पाठव ना ग, मला बघू दे ती कशी दिसते..पण आईनेही कधी माझी गोष्ट मनावर घेतलीच नाही. कारण कदाचित त्या फोटोची किंमत तिला परवडली नसावी.         कधी कधी ती माझ्या स्वप्नांत यायची. माझे डोळे मिटवून "दादा मला आज भुर्र नेशील ना रे"..अशी गोड, केविलवाणी मागणी घालायची. मग मी हो म्हंटल्याशिवाय ती डोळेच उघडू द्यायची नाही आणि हो म्हंटल्यावर अलगद कुशीत येऊन बसायची, जणू  माझ्या हातात कुणी बाहुली तर दिली नाही ना असेच वाटायचे, खूप गोड होती ती खूप...... तिला फिरवताना, तिला कडेवर मिरवताना मी जणू जगाला, माझा सोबती बनवलय अस वाटायचं... हो खूप खोडकर होती आणि तिने विचारलेल्या असंख्य प्रश्नांवर मला नवीन उत्तरे तयार करण्याची संधीही मिळायची..         घरात मी, बाबा, आई आणि ती, बस्स एवढेच, त्यातही मला दूरच ठेवलेले..वडिलांच्या त्या लहानश्या पगारावर माझ्या बाहुलीचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून किती धडपडायचे माझ