Posts

Showing posts from 2018

माझ्या अस्थिर देशा...

कुठे चाललाय महाराष्ट्र माझा ....!! खरंच पावलं पुढे पडत आहेत की मागे ....!!! राज्याच्या प्रतिमेला गालबोट लागतील , अश्या काही घटना माझ्या ह्या पुरोगामी राज्यात होऊ घातल्या जात आहेत ... आधी धर्माधर्माच्या भांडणात गुंतलेल्या प्रजेला आता भांडायला जातींचं नवीन कारण मिळालय ... काही दिवसांनी रंगावरून भांडायला लागतील .... ह्यात शंका नाही !!... राजकारणीच काय प्रत्येक माणूस , होणाऱ्या अस्थिरतेला कारणीभूत असतो ... राजकारण्यांच कामच , लोकांमध्ये भांडण लावून द्यायची आणि त्याचा राजकीय फायदा आपण उचलायचा .. हे वर्षानुवर्षे चालत होत , चालत आहे आणि चालत राहिलाही . कारण प्रजेला आपल्या ताकदीचा अंदाज आलेला नाहीच .. प्रजेला वाटतं २ मिनिटांच्या भाषणात किती तथ्य आहे .. पण त्या भाषणामागची पार्श्वभूमी प्रजेला कशी कळणार . आज जाती जातीत माणूस लढतोय आणि सौख्याने नांदणाऱ्या माझ्या पुरोगामी राज्याच्या इतिहासाला गालबोट लागतंय .. त्याला कोण कारणीभूत आहे ... त्याची काळजी कोण घेतंय

ती आणि न उमललेले शब्द

Image
ती आपली होणार नाही ! या जन्मी तरी !! ह्या वाक्याची किंमतच जणू मोजता येणार नाही ... ती समोर असायची किती तरी वेळ .. जणू आपले हात मैत्रीच्या नात्याने बांधून ठेवले असावे तिने . त्या मैत्रीतही जीव असावा त्याचा . ती समोरून जाताना मनात तिच्याशी बोलता यावं म्हणून मोठ्ठा निबंध तयार होत असायचा .   पण एखाद्या प्रसंगी ती समोर आली की मनातल्या ह्या निबंधातला एक शब्दही ओठांवर उमटत नसायचा , त्याचे हे एकतर्फी प्रेम शेवटपर्यंत कदाचित एकतर्फीच रहावे . दूतर्फीप्रेमा पेक्षा एकतर्फी प्रेमात जास्त ताकद असावी , कारण ते कधीच न संपणारे असावे , दूतर्फी प्रेमाला कुठेतरी सीमा असतेच . तिच्या बाबतीत बोलायला ती आणि त्याचे मन एवढेच लोक जगात अस्तित्वाला असायचे . मनात राहून राहून असंख्य विचार तिच्या बाबतीत घोळ घालायचे . ते विचार लिहून काढायचे म्हंटल्यास एक पुस्तक लिहून पुरे व्हायचे .   रोजच्या सहवासात माणसांचा सहवास कमीच तर एकटेपणा जास्त जवळीक साधायचा . एकटे राहणे सोयीस्कर वाटायचे , कारण त्या एकटेपण

तू बापाला विसरलास

Image
बापाचे गोडवे तू कधी गात नाही आणि बापही तुला कशाची कमी पडू देत नाही..... १ लहानपणापासून बापाची भीती वाटत होती ,  म्हणून तू आईच्या कुशीत विसावलास ... पण घराला घरपण मिळावं म्हणून शरीराच पाणी पाणी करणाऱ्या ह्या बापाला तू विसरलास.....२ दिवसभराच्या उन्हाला शरीराचा सोबती मानत तो राब राब राबला, घरी जाताच चिमुकल्याच्या आलिंगनाची आस धरून जगत राहिला......३ कधी घरापासून दूर गेलास तर आईच्या आठवणीने तू व्याकुळ झालास, पण बापाला तू गेल्याच किती दुःखच होतंय, हेच बघायचं राहिलास.... ४ तुझ्यासाठी बाप म्हणजे ATM मध्येे  पैसे टाका म्हणून रडणं... पण कधी पाहिलस का , ATM भरतं रहावं म्हणून, बापाचं रात्र रात्र जागून काम करणं....५ मुलीसाठी नेहमी तो जादूगरा सारखा जगतो, लग्नाच्या दिवशी तिच्या , स्वतःचे अश्रू लपवत फिरतो.....६ बाप कठोर , निर्दयी , मारकुटा म्हणून  दूरच त्याच्या तू राहिलास, पण तुला मारतानाही किती दुःखं होत असेल त्याला, कधी पाहिलस..... ७ बाप गेल्याच दुःख , बाप गेल्यावरच कळेल का आभाळा एवढी किंमत , रडून रडून मोजशील का........८

देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त

         एक असतात ज्यांना देव आवडत नाहीत , म्हणून स्वतःला नास्तिक म्हणवून घेत फिरणारे आणि दुसरे असतात , देवाचे भक्त , देवाचे पूजक , देवाला सर्वस्वी मानणारे , आस्तिक. ह्यांना तशी वैयक्तिक प्रसिद्धीची गरज भासत नाही कारण देवाला पूजताना त्यांचे नाव लौकिक होतेच. पण आस्तिकांच देवाला वेगवेगळ्या प्रकारे पूजणं नास्तिकांच्या कधीकधी जास्तच नाकीनऊ आलेलं दिसून येतं. मग नास्तिकांवर त्यांच्यातील नास्तिकता कमी करून आस्तिकांसारखं बनू पाहण्याची वेळ येते.                 कधी कधी नास्तिकांना देवाचा राग तरी का आणि कशामुळे आलेला आसतो हे कळने अशक्यच होऊन बसतं. मग आस्तिकांसारखं संकटकाळी ते कुणाला हाक मारत असतील? कुणास ठाऊक.   पण आस्तिकांच्या भक्तीला दाद म्हणून संकटकाळी देव धावून येतो वा येत नाही हा भाग वेगळा. एकंदरीत आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून  स्वतःला नास्तिक म्हणवून घेण्याचा त्यांचा खटाटोप चाललाय अस वाटत...आणि आस्तिक माणसं देवाच्या सेवेत तल्लीन होत दिवसंदिवस पूर्ण बहाल करताना दिसतात. ‎                कधी कधी तर काही आस्तिकांना कोट्यावधी देवांमध्ये आपला जवळचा देव कोणता म्हणून शोधण