Posts

Showing posts from July, 2018

ती आणि न उमललेले शब्द

Image
ती आपली होणार नाही ! या जन्मी तरी !! ह्या वाक्याची किंमतच जणू मोजता येणार नाही ... ती समोर असायची किती तरी वेळ .. जणू आपले हात मैत्रीच्या नात्याने बांधून ठेवले असावे तिने . त्या मैत्रीतही जीव असावा त्याचा . ती समोरून जाताना मनात तिच्याशी बोलता यावं म्हणून मोठ्ठा निबंध तयार होत असायचा .   पण एखाद्या प्रसंगी ती समोर आली की मनातल्या ह्या निबंधातला एक शब्दही ओठांवर उमटत नसायचा , त्याचे हे एकतर्फी प्रेम शेवटपर्यंत कदाचित एकतर्फीच रहावे . दूतर्फीप्रेमा पेक्षा एकतर्फी प्रेमात जास्त ताकद असावी , कारण ते कधीच न संपणारे असावे , दूतर्फी प्रेमाला कुठेतरी सीमा असतेच . तिच्या बाबतीत बोलायला ती आणि त्याचे मन एवढेच लोक जगात अस्तित्वाला असायचे . मनात राहून राहून असंख्य विचार तिच्या बाबतीत घोळ घालायचे . ते विचार लिहून काढायचे म्हंटल्यास एक पुस्तक लिहून पुरे व्हायचे .   रोजच्या सहवासात माणसांचा सहवास कमीच तर एकटेपणा जास्त जवळीक साधायचा . एकटे राहणे सोयीस्कर वाटायचे , कारण त्या एकटेपण