स्नेहलता (भाग तिसरा)
भाग तिसरा
एक महिन्याच्या काळ तो.....आम्हा दोघांच्या नजरा ही जवळपास एक होत गेल्या, पण ह्या सर्व गोष्टी अल्पायुषी ठरल्या.... मी तिची प्रत्येक नजरभेटी जणू जपून ठेवत होतो..कारण मी ठरवून बसलो होता... जणू ह्या गोड आठवणी पुढे आठवताना अलगद आनंद देऊन जातील...
आम्ही दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असो पण मनात कधी पाहता आलं नाही...एकामागून एक दिवस उलटत गेले..आणि दुरावा निर्माण होत गेला... कुणाशी बोलताना मन घाबरतं नसे पण नेमकं स्नेहलता समोर असता आपला खेळ सुरु करायचा . मी प्रयत्न करायचो पण मन मात्र मागे ओढत असायचं.....ती समोर असूनही माझी होत नाही... अस मी म्हणत रहायचो पण प्रयत्न कधी करता आले नाही. राग तरी कुणावर कसा आणि का काढायचा हे सुद्धा कळत नव्हतं. .
माणसाला वेळ गेल्यावर अक्कल येते... हे इथेही दिसून आलं... आज सर्व काही बिनसलंय... काहीच हाती उरलेलं नाही.. ती ही नाही आणि वेळ ही नाही...माझा आळशीपणा मलाच भोवला..आणि वेळ गेल्यावर तो कळतोय.. ती गेली आणि मी ही दुःखाच्या डोहात उडी मारली,...
तिला स्मरून
ती समोर असूनही आपली होत नाही...
ह्याहून न पचणारे दुःख कुठलेच नाही. .. १
तिला पाहुनी परतावे रिकाम्या हातानी......
एकदाही न पहावे कधी, तिने वळुनी .... २
असहनिय अनुभव मिळतो हा ज्याला
किंमत कळली खऱ्या प्रेमाची त्याला.... ३
उत्कृष्ट लिहितोस मयुर, खूपच सुंदर👌, Classic!!, शब्दा शब्दांमधून हे विरह दुःख जाणवून येतंय रे..😢😢
ReplyDeleteदेव करो, प्रत्येकाच्या मनासारखं होवो, हीच प्रार्थना🙏
thanks अनघा
ReplyDelete