'ती' सोबतचा प्रवास....

       आज बाहेरगावी जाण्याचा बेत चालून आला.. नशीब, इतक्या दिवसांनी का होईना आज मुहूर्त जुळून आला...
सकाळ चा प्रवास होता... स्टेशन वर पोहचलो आणि 1 तास ती(रेल्वे) उशिरा येणार हे कळलं... वेळ निघावां म्हणून "सुखाचा शोध" पुस्तकातील काही भाग वाचून झाला...गाडी आली आणी खरा प्रवास सुरु झाला...
          आजूबाजूच्यांच्या फोनच्या रिंग वाजायच्या आणि माझ्या काळजाचा ठोका चुकायचा... कारण पूर्वी प्रवासात असताना 'ती' चा फोन मला येत असायचा... पण आज तसलं काहीच उरलेलं नव्हतं... समोरच व्यक्ती त्याच्या 'ती' सोबत बोलताना आपण त्याला फक्त झुरून पहात रहावं आणि त्यांनी फोन खाली ठेऊन आपल्याशी बोलाव,असलं काम मी करत राहलो...पण प्रत्येकासोबत अस करणे सोप्प नव्हतं. त्यामुळे दिवसभर आपल्यासोबत अस असंख्य वेळ घडत जावं आणि आपण फक्त झुरत रहावं याची मनात पावसाच्या थेंबा एवढि भीती वाटत होती... फक्त त्या थेंबांचं तळं साचू नये.. एवढीच इच्छा...
      अधून मधून माझ्या 'ती' ची आठवण होत असे, कारण इथल्या खूप काही गोष्टींनी तिच्या आठवणींनी काबीज करून ठेवल्या आहेत.. त्या वेळी मी त्यांना सांगितलं होतं की सर्व काही जपून ठेवाल भविष्यात त्यांची पार गरज भासेल... आणि ती गरज आज ते भागवत आहेत...
      दिवस इकडून तिकडे टेहळण्यात निघून गेला, तिच्या बद्दल काही चांगल्या, तर काही वाईट गोष्टी कानावर आल्या, त्याच वाईट अजूनही वाटतंय...त्या दुखावून गेल्या.. 'ति' ची भेट होईल हा बेत आज सफल होईल, अशी इच्छा मनातल्या मनातच राहून गेली...  शेवटी तिचं वाईट होतय याच मला वाईट वाटतय....
        बर आहे... निदान ती नाही पण तिच्या आठवणींना उजाळा मिळाला... तिची आठवण अशीच होत राहील एवढीच इच्छा..
लिखाण:- 21 sept 17

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास