स्नेहलता (भाग पहिला )

भाग पहिला

थोडक्यात तिची वाट पाहताना
"आज मी इथेच थांबणार काळोख होई पर्यंत ... निरोप पाठवून एक दिवस संपुन पुढला दिवस सुरू होणार होता... निरोपाचा काय झालं, तिच्या पर्यंत तो पोहचता झाला की नाही, तिने त्यावर विचार केला असेल का ... अशी अनेक अनुत्तरित प्रश्न मला भेडसावत होती... मी त्यांची उत्तर शोधू तरी तशी, सोबत कुणी नव्हतं ... गरज वाटत होती कुणाची तरी....
मला तिच्याशी बोलता येत नव्हतं पण काय करू... माझ्या समोर परिस्थितीच तशी चालून आली होती... एव्हाना मी बाकीच्यांशी मन मोकळेपणाने बोलू शकत होतो, पण ती दिसताच तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि ठोके ही नुसते घाबरवून सोडायचे. धीर देणाराही कुणी सापडेना.. शेवटी एकटा जीव सदाशिव अशी गत झाली होती माझी......
            तिच्या नकळत टिपलेल्या काही गोष्टी हळू हळू हरवत चालल्या होत्या .. मनात एकदम धसका आला... त्यानीही घाबरवून सोडलं.. वाटलं आपण चुकत तरी नाही आहोत ना.... मला कळत नव्हतं नेमकं कुठलं पाऊल मी उचलायला हवं....... पण एक भाभळी आशा मनात घर करून बसली होती.. ती येईल म्हणून... महिना होत आला पण आजही तिची वाट पाहण्याशिवाय दुसर काहीच माझ्या हाती नव्हतं....."

खरंच..........ती येईल का पण??

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास