तू असतिसं तर....(कविता पाचवी)

तू असतिसं तर....


सांगायचं बरंच होतं ग तुला
पण कधी सांगता आलं नाही....
तुझ्यात रमायच खूप होत मला
पण कधी रमता आलं नाही...1

तुला भेटायचं ही होतं
पण कधी वेळ जुळून आली नाही....
खुप काही बोलायच होत
पण तू कधी ऐकून घेतलं नाहीस.....2

आठवणी बनवायच्या होत्या
पण बनवता आल्या नाही....
तू समोर असतेस तरी
तुझ्याशी भेटायचा धीर होत नाही.......3

मन ही तरसे नेहमी
तुझा चेहरा पहायला.....
आवडेल ग मला
कायम तुझ्याच मनी रहायला........4

कविता पाचवी...😢

आवडल्यास नक्की share  comment  करा 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

देवाचे आस्तिक आणि नास्तिक भक्त

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास