MS DHONI एक निस्वार्थी नेतृत्व..

दोन शब्द

            सहसा कुठल्याही विषयावर लिहिताना मी त्या विषयी  कुणी लिहिले असता त्यावर लिहिणे टाळतो. पण ह्या वेळी परीस्थिती वेगळी होती. MS DHONI नावाच्या जगज्जेत्या व्यक्तीवर मला लिहिणे होते. MS DHONI वर  अनेक पुस्तके लिहूनही झालीत, पण एका चाहत्याच्या नजरेने मी लिहिण्याचे ठरवले..

            लिहिता लिहिता त्यानी केलेल्या विश्वविक्रमांच वर्णन कितीही केले तरीही मन भरत नसे... पण प्रयत्न केले सर्व काही या लेखात सामावून घेण्याचे..

तुम्हाला आवडेल एवढीच आशा..
धन्यवाद.



                 आज  जगात प्रत्येकाला भुरळ पडणारा तू माझा आवडता खेळाडू आहेस, याचा मला मनापासून अभिमान आहे. जगात तुझ्या स्वभावाने, तुझ्या खेळण्याचा विलक्षण पद्धतीने आणि तुझ्या नेतृत्व करण्याचा शैलीने एक वेगळी ओळख निर्माण झाली. एका लहान शहरातून येत तू पूर्ण जगाला वेड्यात काढलस. आज तुझा चाहता, तुझी एक झलक मिळावी म्हणून कुठल्याही स्तरावर जायला तयार होतो. तूझ्या स्वभावानुसार विरोधकास उत्तराव हे चाहत्यांनी तुझ्याकडून चांगलच समजून, शिकून घेतल.  त्यामुळे आज कुठलाही विरोधक समोर आला तर त्यालाही तुझा चाहता बनवून टाकतात.  अशी हि तुझी काया...

                   २००४ पासून सुरु झालेला हा तुझा आंतरराष्ट्रीय प्रवास. ज्यात तू भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलून टाकलास. पुढे घडणारी प्रत्येक गोष्ट हि इतिहासाच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिल्या गेली.

                 



ते म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची सुरुवात शून्यापासून होते, तसेच काहीसे तुझ्यासोबत झाले.  पहिल्या सामन्यात तू शून्यावर धावबाद झालास, पण त्यानंतर सर्वांच लक्ष तुझ्याकडे खेचून घेतलस. शून्यानंतर अविस्मरणीय अस विश्व तू निर्माण केलस आणि तुझा खरा प्रवास सुरु झाला.

                    २००७ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातून भारतीय संघ लवकर बाहेर पडला, आणि लोकांनी खेळाडूंच्या पोस्टर्सची जाळपोळ केली. कदाचित हि घटना शेवटचीच होती. त्याचवर्षी होणाऱ्या T-20 विश्वचषकासाठी तुला कर्णधारपद मिळाल आणि धोनी युगाची सुरुवात झाली.. तिथून पुढे कधी सामना हरल्यावर जाळपोळ करण्यात आली अशी बातमी ऐकायला आली  नाही. आज सामना गमावल्यावर कुणी जाळपोळ करून राग व्यक्त करत बसत नाही उलट शांत राहुन, निकाल स्वीकारत, पुढे येणाऱ्या संधीची वाट
पाहतो कारण क्रिकेट या खेळात प्रत्येकाला दुसरी संधी मिळते.

                     तू असताना वैयक्तिक आणि देशाने नवनवीन विश्वविक्रम नोंदवले.  त्यापैकी एक म्हणजे TEST क्रिकेट मध्ये देशाला तू पहिल्या क्रमांकावर नेऊन पोहचवलस आणि इतर प्रकारातही. त्यानंतर संघ पहिल्या पाच स्थानांच्या खाली कधी घसरला नाही. २००७ ला कर्णधार पद मिळताच त्या संधीच तू सोनं केलस आणि T-20 प्रकारात पहिला वहिला विश्वचषक मिळवून देण्यात यशस्वी झालास. तिथून तू कधी मागे वळून पाहिलं नाहीस. TC च्या कामासारख तुझ Trophy Collector च काम सुरु झाल. हळू हळू महत्वाच्या स्पर्धा आणि मोठे चषकं जिंकून आणत जणू तू जिंकण्याची सवयच लाऊन दिलीस.


World Cup 2011
                     संघाच  नेतृत्व करताना तुझ्या फलंदाजी आणि विकेट कीपिंग करण्याच्या विलक्षण पद्धतीने तू लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप पडलीस. मग तुला तुझ्या स्वभावानुसार Mr. Cool आणि फलंदाजीच्या जादूने Mr. Finisher नाव पडल.  जस जशी तुझ्या चाहत्यांची यादीही वाढत गेली, तस तसा तुझ्या चषकांची  यादी वाढवत गेलास.

               २००७ चा T-20, २००८ ची CB Series, २०१० चा आशिया कप, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २०१३ ची चॅम्पियन ट्रोफी आणि २०१६ ला आशिया कप चा दुसऱ्यांदा खिताब मिळवलास. हे जरी देशाचा कर्णधार असताना मिळवलस पण Chennai Super Kings चा कर्णधार असताना २०१० आणि  २०११ ला IPL चा खिताब आणि  २०१०, तसेच  २०१४ ला  चॅम्पियन लीग चा खिताब मिळवलास. तुझ्या नेतृत्वाची ताकद साऱ्या जगाला कळली. 

                      तुझ्या नावी असलेला तो विश्वविक्रम कोणी मोडू शकणार नाही असा आहे, तीनही प्रकारात चषक मिळवून देणारा तू एकमेव कर्णधार आहेस. इतर कुठल्याच कर्णधाराला जमल नाही, ते तू अवघ्या सात वर्षात करुन दाखवलस. देशाला एकाचवेळी सर्व आनंद साजरे करण्याची संधी  मिळवून दिलीस. तुझ्या नेतृत्वाने जगात खूप काही बदल घडवले. T-20 प्रकारात २००७ पासून तर २०१६ पर्यंत तू देशाचा कर्णधार होतास, पण त्या उलट इतर कुठल्याच देशाचा खेळाडूला एवढ्या काळ आपल पद टिकवून ठेवता आल नाही, हे नवलच. 

                क्रिकेट विश्वातली गेली १० वर्षे अविस्मरणीय राहिली. पण तुझ्या स्वभावाच अजूनही विलक्षण कुतूहल वाटत. एव्हाना चषक जिंकल्यानंतर किंवा शतक झळकावल्यानंतर खेळाडू आपला आनंद गाजावाजात साजरा करतो. पण तू असा खेळाडू  होतास ज्याने आपली ओळख वेगळ्या मार्गाने निर्माण केली. तू शतक झळकावल्यानंतरही शांतच असायचास आणि सामना हरल्यानंतरही.

                एखादी सिरीज जिंकल्याच चषक मिळाल्यानंतर तो युवा खेळाडूंच्या हाती स्वाधीन करण्यात तुझा निःस्वार्थ पणा प्रखरपणे दिसून येत असायचा.
                  हल्ली DRS पेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे .अस म्हणायला हरकत नाही. कारण तुझे निर्णय कधीच चुकताना पाहिले नाहीत. एखादा माणूस आयुष्यात केवढा Perfect असू शकतो.... या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तू आहेस... सरळ साधा स्वभाव ठेवत प्रत्येक काम तू चोख पणे पार पाळतोस.


Champion Trophy 2013
मैदानात असताना तुझी चपळता पाहून विरोधी संघाचे खेळाडूही अचंबित व्हायचे... गोलंदाजाला यष्टींच्या मागून होणारी तुझी मदत ही नेहमीच फायद्याची असायची, अस खूप वेळा पहायलाही मिळालं.. तूला गोलंदाजाला, फलंदाज काय करेल, याचा अंदाज आधीच द्यायचास आणि पुढच्या चेंडूवर तेच व्हायचं.

                भारतीय संघाने तुझ्या नेतृत्वाने प्रत्येक प्रकारचे चषकं मिळवली आणि त्यामुळे देशाच्या नागरिकांना प्रत्येक विजयाची चव चाखायला मिळाली.  म्हणता म्हणता आज कर्णधार पदाला १० वर्ष पूर्ण झाली.       

              २०१५ ची गोष्ट  तुला  मुलगी झाली , पण  तेव्हा तू ऑस्ट्रेलियात होतास, तिला तू चक्क ४० दिवसांनी पाहिलस,  तेव्हा पत्रकारांनी विचारल होत," अस का केलस?"..तुझ उत्तर होत. "आधी देश , इथ भावना ड्रेसिंग रूममध्ये सोडून यायच्या" .. इतका कणखपणे तू  कसा काय वागू शकतोस.
                    विराट, जडेजा, रैना, अश्विन, शमी, रहाणे हि तुझी Investment.. आणीबाणीच्या काळात तू चक्क seniors खेळाडूंना डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होतास, किती टीका सहन केल्यास पण आज  Investment चा Refundable  Profit च  Credit   मात्र तू घेतलं नाहीस.   



                            
T-20 World Cup 2007
                                                     आज २०१७ वे साल. सालाच्या सुरुवातीलाच तू चाहत्यांना रडण्यास भाग पाडलस. तू TEST क्रिकेट मधून  निवृत्त होत त्याचवेळी कर्णधार पदही त्यागलस. तेव्हाही सर्वांना आश्चर्य चकित केलस आणि या वेळी एकदिवसीय आणि T-20 प्रकारातून तू कर्णधार पद सोडताना तुझ्या चाहत्यांना रडण्यास भाग पाडलस.... 
            १४ वर्षांची कारकीर्द सर्वांचे मनोरंजन करण्यात आणि आश्चर्यचकित करण्यात निघाल, पण तुझ्या ह्या कारकिर्दीत तुझा स्वार्थी पणा कधी दिसून आला नाही....  हल्ली स्वतःच्या रेकॉर्डस् साठी खेळणारी खूप बघितली होती पण तू एकमेव होतास जो निस्वार्थपणे आपला खेळ खेळायचास...आणि देशाला उंचावर नेण्यात तू सर्वस्वी मदत करायचास....





                                              तुझें तू ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळून पूर्ण केलेस, १०० यष्टीचीत पूर्ण केल्यास, तसेच १०० आंतरराष्ट्रीय अर्धशतकंही पूर्ण केलीस. अश्या तुझ्या असंख्य मिळकती ह्या आमच्या स्मरणात राहतील .

             तुला विसराव म्हणून तू आजवर कुठलीच गोष्ट  अस्तित्वात जणू येउच दिली नाहीस. तुझ्या स्वभावातली  प्रत्येक गोष्ट समोरच्याला प्रेरीत करणारी आहे... 


जातांना एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते...
तुझ्या कडून महत्त्वाच शिकतोय,

"ज्याला जिंकायचं आहे त्याला हे माहित पाहिजे कधी लढायचं  आणि  कधी शांत रहायचंय"

Comments

  1. अप्रतिम मयूर दादा धोनी सारख्या महान नेतृत्व करणाऱ्या
    व्यतिविषयी तुमचे विचार आवडले मला ।।।।।। एक चाहता म्हणून तुम्ही सगळ्या चाहत्यांच्या मनातली गोष्ट मांडली दादा .......सुंदर दादा .......महेंद्र सिंग धोनी विषयी आणखी वाचायला आवडेल दादा ..... मी पुढच्या लेख ची वाट बघत आहे

    ReplyDelete
  2. छान conclude केले आहेस मयुर..खरच MS कडून खूप काही शिकण्यासारखं आहे..!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Answers for Build confidence with self-promotion

मैत्रीच्या वेलींवर प्रीतीची फुले...

मला बहीण होती.....