माझ्या अस्थिर देशा...


कुठे चाललाय महाराष्ट्र माझा....!!

खरंच पावलं पुढे पडत आहेत की मागे....!!!
राज्याच्या प्रतिमेला गालबोट लागतील, अश्या काही घटना माझ्या ह्या पुरोगामी राज्यात होऊ घातल्या जात आहेत... आधी धर्माधर्माच्या भांडणात गुंतलेल्या प्रजेला आता भांडायला जातींचं नवीन कारण मिळालय... काही दिवसांनी रंगावरून भांडायला लागतील.... ह्यात शंका नाही!!...राजकारणीच काय प्रत्येक माणूस, होणाऱ्या अस्थिरतेला कारणीभूत असतो...

राजकारण्यांच कामच, लोकांमध्ये भांडण लावून द्यायची आणि त्याचा राजकीय फायदा आपण उचलायचा.. हे वर्षानुवर्षे चालत होत, चालत आहे आणि चालत राहिलाही. कारण प्रजेला आपल्या ताकदीचा अंदाज आलेला नाहीच.. प्रजेला वाटतं मिनिटांच्या भाषणात किती तथ्य आहे..पण त्या भाषणामागची पार्श्वभूमी प्रजेला कशी कळणार .
आज जाती जातीत माणूस लढतोय आणि सौख्याने नांदणाऱ्या माझ्या पुरोगामी राज्याच्या इतिहासाला गालबोट लागतंय..त्याला कोण कारणीभूत आहे...त्याची काळजी कोण घेतंय? कुणीच नाही कारण प्रत्येक जण गुंतलाय तो स्वतःला मागासलेला म्हणूवन घेण्यात...
आज मनुष्यजातीचा ऱ्हास व्हायला जात, धर्म ह्या गोष्टी पुरेश्या आहेत..नैसर्गिक आप्पत्या ह्यांचा उद्रेक वेगळाच गणल्या जाईल..
भडकावू भाषणाने प्रजेच्या मनात आग लावून ती विझेल तर समोरच्याच्या मृत्यूने, असा समज निर्माण करत मनुष्यजातीचा ऱ्हास होणे निश्चितच आहे...त्यामुळे नैसर्गिक संकटांची गरज भासणारच नाही.
राजकारण नावाच्या व्यवसायात सर्व राजकारणी एकमेकांपेक्षा स्वतःला मोठेच समजतात..निवडणुकी आधी आमिशांची भरगच्च भरलेली पेटी प्रजेसमोर खुली करतात.. आणि प्रजा बळी पडतेच. कारण प्रजेलाही वाटतंच आपल्या गरजा ही लोक पूर्ण करू शकतील..पण सत्तेत आणलेल्या ह्या लोकांकडून इच्छा पूर्ण होत नाही..काही गोष्टी कळतातही पण, पुढल्या निवडणूकीलाही परत तसाच आमिशांचा पेटारा उघडल्या जातो..त्याला प्रजा बळी पडते. काही झण पैशांवर मत विकतात... हा खेळ असाच चालत राहतो...आणि आपली पावलं आपोआप मागे पडत राहतात...
पूर्ण खेळ असतो फक्त राजकारण्यांच्या आपला आर्थिक फायदा करवून घेता यावा म्हणून....आणि त्याला प्रजा अलगद बळी पडते..

निवडून दिलेल्या नेत्यांनी आपली गोष्ट दिली नसल्यास ती मिळवायला, प्रजा आंदोलनाचा आधार घेते...पण त्या आंदोलनाचीही आता परिभाषा पार बदलून गेलीये.... हिंसक मार्गाने आंदोलन केल्यास त्याचा फरक जास्त पडतो...अशी समज ठेवत सरकारी वाहनांची तोडफोड करावी आणि आपला उद्देश त्यांना दाखवून द्यावा अस सर्वांना वाटत...पण ज्या गोष्टींचे नुकसान केलं जातं त्या गोष्टी आपल्या करीताच असतात हे आपण विसरतो.
उदा. बस... बस म्हंटल की जीच्यावर कुणीही, कधीही, कसाही राग काढू शकतो... अशी ती..पण मग इतर दिवसांत तिच्या मदतीने आपण कित्येक कामं पूर्ण करतो ते का आठवत नाही..? राग काढायचा म्हणून काढायचा... आणि दुसऱ्या दिवशी ती आलीच नाही म्हणून मग स्वतःची लटकून पडणारी कामं पूर्णत्वास जात नाहीत, तेव्हा स्वतःला दोष देत फिराव लागतं..
दुसरीकडे अशांतता पसरवण्यास धर्म, जात, पंथ ह्या गोष्टीही तेवढ्याच कारणीभूत आहेत..अस दिसून येतं. कुणालाही आपल्या धर्मा जाती बद्दल चुकीचं बोलेल आवडणार नाही, पण काही समाजकंटकांना ह्या गोष्टी कराव्याशा वाटतात आणि आपण आपला संयम सोडून बसतो मग रागाच्या भरात एकमेकांवर आपण बरसतो, जणू मागच्या काळातले पक्के वैरी..
पण ह्या बदलत्या काळात आपण विचार केला तर सगळी माणूस जात ही एक करून सर्वांना माणूस म्हणून जगता येणार नाही का...

ते म्हणतात ना
मी माणुस म्हणून जन्मलो होतो,
पण समाजाने दर्जा दिला जातीचा..


त्यामुळे माणुसकी ही नवी जात तयार करता येणार नाही का...?

सहजरीत्या गोष्टी कळून येतात पण वळून घेण्याची आपली तयारी नसते आणि सध्या काही लोकांची समाजात अराजकता पसरवण्यात काहीतरी नवीन आहे अशी समज होऊन बसली आहे...
त्यामुळे ह्या पुरोगामी महा-राष्ट्राला आपली ओळख जपून ठेवायची असेल तर थोडे बदल घडवून आणावेच लागतील..

चल एक होऊया
जय हिंद
जय महाराष्ट्र



मयूर  श्री  बेलोकार 
#शब्दप्रेमी see instagram post

Comments

Popular posts from this blog

Answers for Build confidence with self-promotion

मैत्रीच्या वेलींवर प्रीतीची फुले...

मला बहीण होती.....