मैत्रीच्या वेलींवर प्रीतीची फुले...

दोन शब्द

          वचनपूर्ती म्हणून सर्वात आधी मी तिच्यावर ही कथा लिहिण्याचे ठरवले. दिलेल्या शब्दांवर ठाम राहणे ह्या सवयीचा हा एक प्रकारे फायदाही आणि तोटाही. कथेलाही मला तिचेच नाव द्यावेसे वाटे पण तिच्या होकारा शिवाय शक्य नव्हते...
          माझ्या लेखकी कारकिर्दीतील ही पहिलीच कथा असावी.. म्हणून थोडा आनंदही होतो आणि दुःखही. कारण एखादी गोष्ट आपल्याला मिळायची असते, जिच्यावर आपण मन लावून बसतो, पण ती मिळत नाही, तेव्हा दुःख होत आणि ते असहनीय असतं. आयुष्यात प्रत्येकाने कमवलंय आणि गमवलंय सुद्धा, पण माणसाचं हे जुलमी  मन त्याच्या आयुष्यात येणाऱ्या दुःखदायी गोष्टींकडेच जास्त लक्ष देण्याची संमती देतं.
          आनंदी गोष्टी, ह्या अल्पायुषीच ठरतात, म्हणून लिहिता लिहिता सर्व लिहून झालं की मन एकदाच शांत होईल, या आशेने मी भर भर लिहायला सुरुवात केली... कारण माझ्याजवळ माझं मन हलकं करवून देणारा इतर कुणी व्यक्ती नव्हताच...
          कथेत लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व प्रसंगांचा मी दिलखुलास पणे समावेश केला... मला कधी कधी प्रश्न पडायचा, या कथेला सध्यातरी शेवट कुठला आणि कसा द्यायचा म्हणून, कारण पुढच्या तीन वर्षात आणि पुढे आयुष्यात ती कुठल्याही कारणाने असो पण ती अनेकदा माझ्या समोर येणारच होती, माझ्या तिच्याशी संवाद होणार होता.. पण शेवटी मी एका ठिकाणी थांबून गेलो...
भाग ०१ 
सुरुवात

         आयुष्याच्या विशीत हजारो विचार मनात घोळ करतात. मन अगदी गोंधळून जातं, त्याचा त्रास होतो आणि चेहऱ्यावाटे तो सर्वांना दिसून येतो. कदाचित मनावर मेंदूने पूर्णपणे ताबा ठेवला असता तर मनाने केलेलं अत्याचार नाहीसे करता आले असते आणि जे होणार असतील त्यांनाही नियंत्रित करता आलं असतं.
         आपल्याला आयुष्यात खूप काही गोष्टी साध्या आणि सरळ वाटल्या असत्या, नेहमी आनंदी राहता आलं असत. चेहऱ्यावर हास्यरेषा चोविस तास उमटल्या असत्या..पण शैतानाची पिल्लं जणू आपला मागोवा घेऊन असतात .. आणि माणसाच्या आयुष्यात एखादा आनंदी क्षणं साजरा होताना पाहताच त्यावर झडप घालू पाहतात. कधी कधी मानवी आयुष्याला नेमकं दुःखी समजावं की सुखी समजावं ह्यातून निष्कर्ष काढणे कठीणच वाटत ..
        आयुष्यात खूप सारे प्रसंग येतात, जे आपल्याला नको असलेल्या गोष्टी करायला भाग पाडतातं, काय करावं तरी ह्या मनाचं? असा प्रश्न पडतो, त्याचा स्वभावच लवकर उमगत नाही. त्याला वळण लावायचं तरी कसं. घडलेल्या वाईट गोष्टी या ना त्या निमित्ताने समोर येतंच राहतात
          आयुष्य अश्याच प्रकारे वाहतंय, जणू नदी वाहतेय आयुष्याची, अश्रूंच्या खाऱ्या पाण्यानी आणि सारी दुःख जणू समुद्रात जाऊन मिळतात आणि एकमेकांचं सांत्वन करू पाहतात. अश्रू ढाळणाऱ्या काही प्रसंगात माझाही समावेश होता. श्रावणी नावाची मैत्रीण होती, माझ्या आयुष्यात गोड, अबोल राहणारी, आपल्या डोळ्यांनी समोरच्याला खेळवणारी, अशी जी लहानपणापासूनच्या आठवणींमध्ये ती सामील झाली होती. मला अजूनही चौथ्या वर्गातील तिच्या सोबतच्या काही आठवणी आठवतात..ज्या मला कायम सांभाळून ठेवायच्या आहेत, त्या माझ्यासाठी अजरामर आहेत....
           तीचे ते अबोलपण सर्वांना थक्क करून ठेवणार होतं. मी तिच्या शेजारी बसायचो. मी पुढे बोलका निघालो आणि ती शांतच, अबोल .. तिच्या ह्या वागण्या मागच कारण तिलाच माहिती असावं कदाचित. आजही शाळेसमोरून जाताना अलगद जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि आजची परिस्थिती पहिली की त्याच डोळ्यांतून अश्रूंना वाहायला सुरुवात होते. अशी ही माझ्या मनाची सध्यस्थीती.
          हळू हळू आम्ही दुरावलोचौथी नंतर शाळा सोडल्यावर दहावी पर्यंत मी इथेच होतो. तरीही आमची त्या सहा वर्षात एकदाही भेट घडली नाही. नंतर मी गाव सोडले थोडा दूर गेलो. तिथे तीन वर्षांचा डिप्लोमा घेतला. तिथले शिक्षण संपवून गावी परतलो आणि पुढल्या शिक्षणासाठी मी जवळच्या कॉलेजला प्रवेश मिळवला.. दरम्यान तिने दहावी नंतर बारावी केली आणि नंतर डिप्लोमाला प्रवेश घेतला त्यामुळे ती दोन वर्ष मागे राहिली. यामागे तिच्या शिक्षणाची गोडी असावी अथवा आणखी दुसरं काही, हे तिलाच माहिती असावं.
          ती ही ह्याच कॉलेज मध्ये शिक्षण घेत असेल म्हणून ह्याची मला थोडीही जाणीव नव्हती. कॉलेज माझ्यासाठी नवीन होतं. हळू हळू कॉलेज मधल्या वातावरणाशी मी समरस झालो... नवीन मित्र मैत्रिणी बनत गेल्या. त्यात एक होती सायली. खर तर सायली साठी एखादा वेगळा लेख लिहायला पाहिजे, कारण तिने केलेली मदत जणू लेख लिहूनच पूर्ण  सांगता आली असती.
          गेल्या दहा वर्षात मी तिला पाहिलेलं नव्हतं. पण लहानपणीचा तो हसरा चेहरा माझ्या अजूनही लक्षात होता..असाच एक प्रसंग तेवढ्यात घडला...त्या चेहऱ्याशी मिळता जुळता आणि हसरा चेहरा अचानक एक दिवस सेमिनार हॉल जवळील त्या वळणावर माझ्यासमोरून जाताना दिसला. मला तिने ओळखलं की काय, जणू मला तेव्हा प्रश्नच पडला होता. नेमकं काय घडलं कळायला जरा जड जात होतं. कारण ती त्या वळण वर अचानक माझ्या कडे हसून पाहत, समोर निघून गेली होती.
         मी पुढले काही दिवस ह्या हसऱ्या चेहऱ्याचा विचार करत राहिलो, कारण हा चेहरा त्या लहानपणीच्या चेहऱ्याशी जुळत होता.
भाग ०२ 
     तिथून काही दिवसांनी मी सायलीशी लायब्ररीसमोर परत भेटलो आणि तिथे तिला विचारून ती तीच बालपणीची माझी मैत्रीण आहे हे पक्क केलं आणि तीला बाहेर बोलवायला सांगितलं. ती आली आणि आमच्या बालपणीच्या आठवणींचा पाढा वाचायला सुरुवात झाली... काही आठवणी तीला आठवत होत्या तर काही मला.. ह्या निमित्ताने आठवणींची देवाणघेवाण झाली...बिचारी सायली आमच्या गोष्टी ऐकून बोर होत होती म्हणून काय तर तिथे असलेल्या चपलींसोबत खेळायला सुरुवात केली होती..
     पुढले तीन वर्ष ती माझ्या समोर असणार होती काही नवीन आठवणी तयार होणार होत्या. जाता जाता मी तिला सांगून गेलो की मी काही लेख लिहितोय ते म्हणजे "हिरवळ जग" आणि "हरवलेलं प्रेम"  ह्या लेखांना मी तेव्हापासून पूर्ण करायला सुरुवात केली.. जेणेकरून ते तिला वाचता यावे म्हणून आणि तिने "हरवलेलं प्रेम" हा लेख वाचला सुद्धा ... जणू हे माझं लिखानातलं पहिलं यश..चौदा पानांचा तो लेख मी तिच्याकरिता घाई घाईत पूर्ण केला आणि ह्या प्रसंगामुळे माझे लिखाणात जास्त लक्ष लागायला लागले.. एकंदरीत माझ्या लिखाणाला गती मिळाली ती जणू तिच्या भेटीमुळेच.
     पुढे जाऊन आमच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्याला कारणीभूतही सायलीच ठरली आणि ती घटना माझ्या आयुष्यातली सर्वात दुःखदायी ठरली. काहीही गरज नसताना, श्रावणी मला मैत्रीण म्हणून हवी असताना, सायलीनी  तीला प्रेमाची विंनती करण्यासाठी ठेका धरला.. मला उत्तर ठाऊक होतं. पण ती म्हणायची एकदातरी बघ विचारून, कदाचित ती "हो" म्हणाली तर!!
     मग काय, तिच्या अट्टहास पुरवावा म्हणून मी तिला विचारण्याकरिता एक दिवस ठरवीला... असे कितीतरी दिवस मी मनातल्या मनात तयारी करत गेलो आणि कितीतरी वेळा मी वेळ न जुळून आल्याने मला माघारी परतावे लाागायचे... दरवेळी मनात नवीन नवीन संकल्पना तयार व्हायचा...तिला अस विचारू तिला तस विचारू... अस केलं तर काय होईल तस केलं तर काय होईल..वगैरे वगैरे....
     दिवसा मागे दिवस उलटून सूर्यदेव रोज समोर यायचे आणि विचारायचे  "तू  विचारणार आहेस का तिला? की आजही रिकाम्या हातांनी परतशील...
मी ही त्यांना हो म्हणत तिची भेट व्हावी म्हणून प्रयत्नांत असायचो. पण कुणास ठाऊक कोण आड येत आणि आमची भेट अडवतो.एखादी जीवलग वस्तू हरवल्याच्या भावनेनं मी परत त्रासून जायचो कारण ती वस्तू समोर असते पण ती दिसूनही ही मिळवता येते नाही..... मग मनही हळहळतं आणि त्याला सांभाळून घेणारही जवळ कुणीच नसत. नकळत आज तिच्यावर प्रेम करून बसलो. हे माझं नशीब की चूक, हे तिलाच ठरवता येईल. देवही मन देऊन गेला पण ते कुणावर लावायचं हे न सांगताच निघुन गेला  आज मी त्या मनाला तिच्यावर लावले होते, कुणास ठाऊक त्यातून मला काही मिळणार होते. 
         शेवटी मी तिला एकदिवस थांबवलंच आणि म्हंटले "दोन मिनिटं थांबतेस का? थोडं बोलायच आहे तुझ्याशी...." तिने परत तिच्या स्वभावानुरूप उत्तर दिले...तिचा स्वभाव म्हणजे स्वतःला आपल्यातच गुंतून ठेवणे. इतर गोष्टींमध्ये ती काहीच रस दाखवायची नाही...तिच्या ह्या स्वभावायचे मला कुतूहल वाटायचे... कारण आजूबाजूला मन रमतील अश्या इतक्या गोष्टी होत असताना तरी ही अशी वागायची....कुणास ठाऊक तिला कसे जमायचे..
     तिने dept ला जाण्याचे कारण सांगत आणि बोलायच टाळलं...मला त्यावेळी खूप राग आला, पण आपला राग न दाखवता मी तिथून निघून गेलो....थोड्यावेळाने ती आणि तिच्या मैत्रिणी कॉलेजच्या बाहेर बसलेल्या दिसल्या...वाटलं हिच्याकडे इतका वेळ असतानाही ही असलं कारण देऊन मला टाळून गेली...मग तिच्या समोरून तावातावात जोरात गाडी पिटाळत घराकडे निघून आलो..तिकडे सायलीने माझ्या रागाच कारण तिला सांगितलं...आणि काही बदल होताना दिसुन आले.. तिचे कॉल वर कॉल, पण मी उचलायला तयार नाही... मधून मधून उचलायचो आणि सायली म्हणायची.."रे तिला बोल आज तुझ्याशी" मी म्हणायचो, "का आता कसा वेळ मिळतो हिला...मी जेव्हा समोर होतो तेव्हा काय झालं होतं बोलायला"...एवढं बोलून मी कॉल कट करत राहिलो..शेवटी श्रावणीने तिच्याच फोनवरून कॉल केला आणि मला तिच्याशी बोलायची ओढ झाली आणि हुंदक्यांसोबत बोलायला सुरुवात झाली...

   सोबत काही दुःखऱ्या रात्रींची दाहकता तिच्या समोर मांडून झाली.. डोळ्यांत पाणी उभे राहिले...कितीतरी दिवसांनी त्यांना वाट फुटली होती... त्या दिवसाचे फोनवरचे संभाषण  हे शेवटचे ठरले. सायलीने जेवढे प्रयत्न करायचे तेवढे केले...कुठेतरी मीच कमी पडलो...अस मानत मी माघारी आलो..
  
त्यानंतर खूप दिवस होत आले  माझी नी तिची साधी नजरभेटही झाली नव्हती ...मग मी व्याकुळतेने तिच्यावर लिहिले होते... जणू ती माझ्याशी समोर उभी आहे या बेताने...
             "मी मागे म्हटलं होतं ना तुला की आपल्या नजरभेटीची मला गरज आहे, ती कधी होईल आणि कदाचित होणारही की नाही अस वाटत होतं.... समोरून काहीच उत्तर येत नसताना आपण परत परत तेच प्रश्न करावे ह्याहून मोठा कुठला  मूर्ख पणा नसावा.. पण काय करू तुझ्या भेटीची, निदान नजरभेटीची ओढ मला रहावत नाही.. त्यावर उपाय सांगेल तरी कोण कारण मी कुणाशी बोलतही नाही... आणि आपलं आयुष्य कुणी सार्वजनिक करत का....
              कधी कधी तुला पाहून माझी बेचैनी मी कुठल्या शब्दांत मांडू हे ही कळत नाही ... तू म्हणशील तुझ्याहून मूर्ख नसेल कुणी....? हो ग तू खर बोललीस! कारण मी तुला पाहिल की स्वतःलाही सावरू शकत नाही माझे हाल मी जाणतो.... तू का समजून घेशील म्हणायचं... तुला माझ्या जगाची कल्पना सुद्धा नाही ग... तूला पाहिल्यावर  मला प्रत्येक क्षण जड जातो .... खर प्रेम केलाच हा अनुभव मी चांगल्या प्रकारे अनुभवतोय...
समोर बसली आहेस माझ्या तू ....तुझ्याशी दोन शब्द तरी बोलायला मिळावे म्हणून आतूरलोय ग मी ... जमिनीवर जन्मलेल्या रोपट्याला जशी पहिल्या पावसाची दाट गरज असते तशी मला तुझी आज गरज आहे.

                  एक न एक दिवस मोजून ठेवलाय मी आपल्या अबोल राहण्याचा कुणास ठाऊक ह्याचा शेवट कधी होईल तर... 
तू बोलावसं म्हणून कुठल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी ग मी. सांग ना तू मी ते ही करेल....अगदी जीव जाईल तिथं पर्यंत सुद्धा... तू माझ्या साठी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेस ग ते कसं पटवून सांगू तुला.... तुला पाहिलं न की मनात असंख्य अनुत्तरित प्रश्न चांगले बोचत राहतात ग.....
नको बोलुस तू नाही बोललीस तरी चालेल आज मला तुला डोळे भरून पाहू तरी देशील त्यातच मी माझं भरवून घेईल।
शेवटी पाण्यात बुडल्यावर माणूस गवताच्या काडीचा ही आधार घेऊ लागतो तसा तुझ्या नजरभेटीची आधारे घेईल मी आणखी काही दिवस घेईन जगून.

                                 भाग ०३

माझ्या स्वप्नातला एक किस्सा तुम्हाला सांगतो 
आज लिहिण्याचे निमित्तच खास होते,
आज ती माझ्या स्वप्नांत दोनदा येऊन गेली.. एक पचायला तिखट तर दुसरे गोड होते
पण दुसऱ्या स्वप्नाने पहिल्याला विसरायला भाग पाडले एवढे ते गोड आहे असे म्हणायला हरकत नाही
प्रत्यक्षात ती अजूनही माझी नव्हती आणि  होईल की नाही ते ही माहिती नाही पण मनोमनी माझ्या मनाने तिला स्वीकारले होते (वा) का बरे असे व्हावे . तिच्या बाबतीत घडणारे प्रसंग हे  योगायोग समजावे की अजून काही.... कुणास ठाऊक...  
पण ह्या गोष्टी मला माझ्या जगण्याच्या उम्मीदित अजून भर पाडून देत तात्पुरता मी खुश व्हायचो पण त्यालाही ग्रहण लागायला सुरुवात व्हायची...
कदाचित आपल्याला पडलेल्या हजारो स्वप्नांनापैकी एका स्वप्नाला खर करायची मुभा असती तर...
अर्थातच मी तीच्या बाबतितलं एक स्वप्न खर करायला मागितलं असत.... नेमकी ती प्रत्येक गोष्टीत आठवायची  म्हणायला प्रेम हे बाकी व्यसनांपेक्षा भयंकर समजावे सुटता सुटता सुटेनात..
स्वप्नात आज ती दिलखुलास पणे माझ्याशी गप्पा करताना दिसली होती .. पण त्यातही तिच्या काही अटी होत्याच आपण इथे नाही तिथे बोलू, हे बोलू ते बोलू, वगैरे वगैरे, समोरचा व्यक्ती कितीही क्रूर कडू असता तरी एकदा तिच्या वर प्रेम केले तर स्वतःला थांबवताच येत नाही ....
त्या गप्पा एक एक जागा बदलत बदलत चालू होत्या...
मी ही रमत होतो  आणि तीही का तर खूप गोड वाटत होतं जणू ही झोप तुटू नये म्हणून काही तरी करून ठेवायला हवं होतं असे वाटत होते
देवालाही काय दोष द्यावा म्हणाव चांगल्या गोष्टींमध्ये नेहमी अडथळे तयार करून ठेवायचे काम त्यानी केले म्हणावे...
स्वप्नात दिसलेले ते क्षणिक क्षण मला सुखावून गेले.... कुणास ठाऊक मी ह्या काल्पनिक चित्रांवर  किती दिवस जगणार तर
माझ्या हृदयाची हाक तिज पर्यंत कधी पोहचेल तर.. 

Dear श्रावणी

हळू हळू तिच्यावर माझ लिखाण वाढल होतं, म्हणायला तिच्यामुळेच माझ लिखाण वढ़ल होत, पण मि फक्त तिच्यावरच लिखाण वाढवलय, हे मला उशिराच  कळलं. काही दिवसांनी तिचा वाढदिवस होता. आणि तो दिवस मि माझ्या शब्दांत असा मांडला.    
                                भाग ०४
12 ऑगस्ट 17
आज वाढदिवस ग शिवू तुझा मी विसरेल तरी कसा......
माहिती नाही मी उशीर केला असावा की नाही तर. तुला सकाळी 12.15am ला msg केला होता.... तुझी संमती असती तर मोठ्या गाजावाजात साजरा केला असता. कारण मी तेवढी अईपत खिशात आज घेऊन फिरत होतो... पण तू आज वर माझं कडच काहीच घेतलं नाहीस...देव करेल तर भविष्यात एकदा तरी माझ्या भेटवस्तूचा स्वीकार करशीलच.
               तुझे कॉलेज ला येऊन दहाएक दिवस झाले असावेत. दिवसातून एकदातरी तुझ्यावर माझी नजर पडतेच आणि त्याच दुःख ही होतं तसाच आनंदही होतो... तू समोर असूनही माझ्या जवळ नसल्याच दुःख मी कुणालाच सांगू शकत नाही आज तुझी भेट ही भुके सारखी होऊन बसलियेे. तू नाही दिसलीस तर पोटात कावळे ओरडायचे सुरूच राहतात..... भूक मिटत नाही.... आणि तुही जवळ येत नाहीस.......
        शिवू तू कितीही प्रयत्न केले तरी माझ्या देवाचे प्रयत्न हे सुरूच राहतात. तू दिसाविस म्हणून काहीना काही नवीन खेळ तो खेळतच राहतो...आणि तुझी भेट होतेच... एवढ्या करिता मी त्याचा आभारी आहे.....माफ करशील मला आज काही करता आलं नाही... मला तुझ्याच उत्तरांची खूप भीती आहे... मी काही करावं आणि तू कायमच बोलणं बंद करशील तर....माझं जिणही कठीण होऊन बसेल ना
        तुला केलेल्या wishच उत्तर 15.56 मला आज संध्याकाळी मिळालं .... मला ह्याच्या खूप आनंद आहे... बस तू अबोल राहू नकोस एवढीच इच्छा त्या देवाकडे....
आजकाल मित्रही मला तू दिसलीस तुझ्या नावाने हाक मारतात..पण त्यांना खरी  कहाणी तरी कुठे माहीत आहे
 
                               भाग ०५

पावसाचे वेड  लगते तेव्हा 

पाऊस येण्याचे संकेत दिसत होते आणि मी लिहायला बसलो....
पहिला पाऊस
आज काही कारण नसताना मी त्याची वाट पाहत होतो आणि त्याने वेळही खूप सुरेख साधली अस म्हणायला हरकत नाही. पहिला पाऊस पडला तो ही दुपारच्या वेळी मनसोक्त पणे तो  साजरा करता आला....
          आज माझ्या शब्दांना आज ती काहीच किंमत नाही देणार  .. पण काय करणार हे शब्द साधे सरळ जरी असले तरी माझ्या मनातले आहेत .... त्यांना एकदा तरी जवळ घेऊन  पहा...
         बघ ना आज पाऊस पडलाय पहिला.. त्याला कदाचित माहितीये मी जशी तिची वाट बघायचो ना तशीच त्याचीही पाहत होतो . पण आज कळलं तिच्या पेक्षा जास्त काळजी त्याला आहे माझी..  पण मी तिचीही वाट पाहतोय .. खूप दिवसांनी न घडलेल्या नजरभेटींचीही ... कदाचित होईलही ती कधीतरी पूर्ण. पण तिने इतकी वाट पहायला लावावी. माझ्या नावी कुणाला दुःखावणाऱ्या गुन्ह्याचीही नोंद सापडणार नाही.
          ज्यानुसार इतरांनाही... पाऊस जवळचा वाटतो, तसा मलाही खूप आवडतो कारण पावसाच्या प्रत्येक थेंबात त्यांनी तिची आठवण सोडलीये आणि ती काबीज करण्याच्या प्रयत्नात मी कित्येक वेळा पावसात भिजायला तयार असतो.....आयुष्यात आपल्या मोजताही येणार नाहीत  इतक्या भेटी हव्या आहेत मला त्या ती देईल का पण....

                                 भाग ०६

आज अश्या प्रकारे तिच्याशी बोलण्याचे कारण म्हणजे मी खूप दिवस झाले तुला काही गोष्टी सांगणार होतो. पण सांगू शकत नव्हतो, कारण जेव्हा हि बोलायचं मी प्रयत्न करायचो तेव्हा तिचा चेहरा आनंदी दिसत नसायचा. आज मला आपल्या तेव्हापासूनच्या गोष्टी सांगायच्या आहेत जेव्हा आपण एकमेकांना फक्त चेहऱ्यानीच ओळखायचो. आणि आज आपण सर्व गोष्टींनि ओळखतोय. मला माहितीये मी विचारलेल्या प्रत्येक गोष्टीला तिच्याकडे नकारात्मक उत्तर असेलच जे ऐकून मला त्रास होईल/रागही येईल. कॉलेज मध्ये तिचा हसरा चेहरा पहिला कि मलाही हसून पहावस वाटायचं मग ती वेळ निघून गेली कि परत तीच गोष्ट परत डोक्यात यायची . जी यायला नको असते....

माझ्या बाबतीत आजवर, मी आजवर जेवढेही मित्र/मैत्रिणी कमावल्या असतील त्या तातपुरत्याच राहत आल्या . मग या गोष्टीला विरुद्ध तू होतीस कारण तू १० वर्षांनी का होईल ती मला परत मिळलीस अस वाटत.. पण तिच्या ह्या अबोल राहण्याचा मला पार पार राग येत असायचा... ती कितीतरी दिवस झालेत माझ्याशी बोललेली नाही मग मी तीला एक टोपण नाव दिल.. ते होत #Sunshine... त्या हि मागे एक कारण होत.. कधी भेट झाली तर आवर्जून सांगेल तिला असे ठरवले होते मी..... मला माझ्या आयुष्यात एक तरी मित्र हवा होता जो शेवट पर्यंत सोबत राहील मग समोर परिस्थिती कशाीही असो ... ते सारं आपल्या मनावर आहे आपण कुणाला काय माहित पडू देतोय आणि काय नाही तर.. तिने स्वतःहूनच तिचें आयुष्य विस्कळीत करून ठेवले होते .. ते पाहून मलाहि राग यायचा... माझ्या भूतकाळातली एक गोष्ट सांगायची होती तिला.. "माहिती नाही मला कि तुला चौथी नन्तर मी आठवत असेल म्हणून पण जेव्हा मी बाहेर अमरावतीला होतो तेव्हा तू आठवायचीस मला वाटायचं तू असशील तशीच जशी आधी होतीस.... कदाचित जर मी चौथी नन्तरही तुझ्याच सोबत असतो तर....... आज दिसणार चित्र फार वेगळं असत... मला तुझ्या कडून अस काहीच नकोय कि जे तू देऊ शकणार नाहीस ...... तू माझ्याशी बोलत रहाव आपल्या जुन्या आठवणी नेहमी जिवंत रहाव्या अस वाटत. आणि खरतर हेच हवंय मला या आयुष्यात तरी......"



आज तिच्याबाबतीत सांगायला अश्या खूप साऱ्या गोष्टी मनात दाटून आहे कदाचीत भविष्यात पुढे जाऊन त्या तिला सांगता येतील... पण आज धीर होत नाहीये.... तिने नेहमी माझ्या संपर्कात रहाव वाटत... राहील का ती...?

हे तर फक्त तिच्या बद्दल सांगितलंय माझ्या बाबतीत सांगत राहलो तर पुस्तक लिहून होईल...कारण माझ्या वयाच्या विसावीतच मी इतक्या गोष्टी पहिल्या आहेत कि पुढे जायची इच्छाच संपली आहे जणू.......

मला भविष्यात एक कादंबरी लिहायची आहे एका विशेष व्यक्तीवर आणि ती तू हो कारण माझ्या नजरेला तूच भुरळ पडू शकतेस आणखी कोणीच नाही.


                               भाग ०७

आणि हे माझ तिच्यावरच  शेवटच लिखाण मला थांबायच  नाहीये  पण काय करू मला हां शेवट ठरवावा लागेल
                              
मला आज तिला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते.. हल्ली माझं बालपण कुणी उकरून काढायचं पाहतो तर तेव्हा पहिली जी गोष्ट आठवते ती गोष्ट म्हणजे ती असते... पण का ते कदाचित कुणाला माहितीही नसेल.. मग मला तिच्यावरच्या सर्व आठवणी बाजूला सारून दुसऱ्या गोष्टी समोरच्याला व्यक्तीला सांगाव्या लागतात... आज माझं बालपण म्हणजे ती आहे, म्हणायला तोडक्या मोडक्या आठवणी आहेत आमच्या बालपणातल्या, पण त्याही किती सतावत आहेत बघा ना..ते तिचे मी बनवून आणलेली कात्रणं चोरून नेण्याची आठवण, तिच्याशी खोड्या करण्याची आठवण.. आणि तिचं ते नेहमीच अबोल पण जे अजूनही तेवढंच जिवंत आहे.. ह्या प्रखर पणे तिचा विषय निघाला की आठवतात.. का पण??



३ वर्षांआधी आम्ही जवळपास १० वर्षांनी परत भेटलो. कदाचित तिला मी त्या १० वर्षात आठवलोही नसेल पण मी बाहेरगावी असताना तिची परत भेट घडावी म्हणून मी आतुर होतो.. अधून मधून ती मला आठवायची आणि त्यामुळे आमच्या जुन्या आठवणी आणखी दाट होत गेल्या.. ज्या प्रकारे वटवृक्षाच्या मुळा जमिनीत जश्या रुजून बसतात त्याप्रमाणे ह्या आठवणी मनात कायमच्या घर करून बसल्या.. मग पुढे मोकळ्या वेळी मन भूतकाळात गेले की त्यांना ह्याच आठवणींचा आधार असायचा.

सध्याचा तिचा स्वभाव म्हणायला खटकणाराच आहे. तिच्याकडंच माझ्याकडे पाहून ते तात्पुरत हसणं. माझ्या चांगलंच लक्षात रहायचं..पण मग ह्या दुःखी मनाला थोडं सावरून, ती समोर तरी आहे असं म्हणत धीर द्यायचो.. तिला गमावण म्हणजे जणू माझं बालपण एका क्षणात नाहीस होणे.. अर्थातच तिने माझ्या बालपणावर जणू अधिराज्य मिळवलस.. ज्यात शिरताना तिची आठवण काढूनच पुढे जावं लागत..

गेली तीन वर्षे सलग मी तिच्यावर लिहीत होतो.. काही लिखाण तिच्यापर्यंत पोहचायचं तर काही राहून जायचं म्हणून आज हे सारं कागदावर लिहून काढलंय..

आज मला तिला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते तिच्या संपर्कात राहता यावं म्हणून social media वर ती जिथे जायची तिथे मी यायचो. आणि काही दिवसांत मी तिथून कायमचा block व्हायचो.. तिच्या म्हणण्यानुसार मी मैत्रीच्या पुढे कधीच गेलो नव्हतो पण तिला नेहमी वाटायचं की मी पुढचा विचार करतोय म्हणून ह्या गैरसमजुतीमुळे माझा आणि माझ्या मैत्रीचा घात झाला..

पण तरीही आमच्या मैत्रीचा शेवट इथेच होईल म्हणून मला नाही वाटत मी पुन्हा नव्या सुरुवातीची वाट पाहिल अस मनापासून वाटत...
अश्या सुंदरश्या आठवणींचा शेवट हा वाईटच असेल ह्यात शंका नाही पण आज एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते... जग खूप लहान आहे आणि आमची भेट पुन्हा कुठे ना कुठे नक्की होईलच... अस मला मना पासून वाटतं..... 

शेवट 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Answers for Build confidence with self-promotion

मला बहीण होती.....