आयुष्याच्या विशीतला एक प्रवास

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास

ह्याला प्रवास म्हणाव की फुटक्या नशिबाच कारण म्हणावं.....

एन आयुष्य संभाळत, त्याला नवीन वळणावर आणायची वेळ येते....
साथीला साथ देणारा कुणी तरी अचानक सोडून जातं.....

मग जीवना पेक्षा मरण जवळच वाटू लागतं. शेवटी कुणीच कुणाचं नसत ह्यावर विश्वास बसतो. 
कदाचित देवाने परिस्थिती हाताळण्याची मुभा माणसाला दिली असती, तर त्रासून सोडण्याऱ्या ह्या गोष्टींना आयुष्यापासून लांब लांब सोडून ठेवलं असत....

जेव्हा कुणी सोडून जात....
मग त्यावेळी  माणसाला त्याचे सोबतीही त्रासदायी वाटतात आणि तो कागदांच्या स्वाधीन होतो..
त्यात कवी संचारतो..... त्याच्या कवीपणाला जणू ती वाव मिळावा म्हणूनच त्याच्या आयुष्यात येऊन निघून जाते.........
कवितेतल्या त्या विरहित शब्दांना हिऱ्याहूनही अधिक मोल असावे... समोरच्या व्यक्तीच काळीज विघळून टाकणारे ते शब्द जणू ती त्याच्या स्वाधीन करायला आलेली असावी.....

त्याच्यातला कवीपणा प्रत्येक गोष्टीला अश्याप्रकारे रंगवतो की जणू ते ही त्याच्या दुःखात शामिल आहेत...
पावसालाही तो आपल्या मैफिलीत सामील करून घेतो...

सर्वात जास्त सोबतीला राहणारा तोच असतो बाकी पाहुण्यासारखे असतात...
त्यात संचारलेला कवीपणा शिखर गाठतो पण ती येत नाही..... 
तिने दिलेला कवीपणा हा आयुष्यभरासाठीचा साथीदार होऊन बसतो...

ती येत नाही तरीही हा प्रवास अखंडीत राहतो.....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Answers for Build confidence with self-promotion

मैत्रीच्या वेलींवर प्रीतीची फुले...

मला बहीण होती.....