स्नेहलता..(भाग दुसरा )

भाग दुसरा 

थोडक्यात तिची वाट पाहताना

                                संध्याकाळची वेळ ती, चहाचा पेला हाती घेऊन बाल्कनीला उभा होतो. रिमझीम  पावसाच्या सरी सुरू होत्या... तेवढयात एक थेंब चहाच्या कपात येऊन विसावला...आणि तिची आठवण झाली .. पाऊस नेहमीच तिची भेट होत रहावी म्हणून मला साथ देत आला..तिच्या नजरभेटिंची चित्रफीत तिच्या अनुपस्थितीत डोळ्यांपुढून चालून येत असे...पावसाचं आणि माझं चांगलंच स्नेह वाढलं होत..पण तिच्यासोबत स्नेहवाढाव म्हणून मी आतून झालोय.. वेळोवेळी येऊन ज्या प्रकारे पाऊस दाद द्यायचा जणू तो ही मिलनाची वाट पाहत असावा, असे वाटे. आज निरोप देऊन तिसरा दिवस उलटणार होता, तिची वाट पाहणंही थांबत नव्हतं, विरहाच्या या दुर्दैवी काळाला तिने थारा द्यावा एवढीच इच्छा होती...,आजची संध्याकाळ इच्छा नसूनही विरहमय होत चालली आहे..पण पावसाच्या भेटीने थोडा धिर आला आणि तिच्या आठवणींत चहा संपला.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Answers for Build confidence with self-promotion

मैत्रीच्या वेलींवर प्रीतीची फुले...

मला बहीण होती.....